अमेरिकेच्या खुलाशाने जग हादरलं, भारतावर टॅरिफ लावण्याचे धक्कादायक कारण पुढे, डोनाल्ड ट्रम्प यांच्या…
GH News August 20, 2025 02:14 PM

भारतावर अमेरिकेने टॅरिफ लादल्यानंतर खळबळ उडाली. डोनाल्ड ट्रम्प हे टॅरिफच्या मुद्द्यावर भारताला धमकावत आहेत. मात्र, भारताने अमेरिकेच्या अटी मान्य केल्या नाहीत. अमेरिका कायमच भारत आमचा मित्र असल्याचे सांगत. मात्र, अमेरिका कधीही कोणालाही धोका देऊ शकते, हे टॅरिफच्या मुद्द्यावरून स्पष्ट झाले. आता थेट टॅरिफच्या मुद्द्यावरून अत्यंत मोठा खुलासा हा अमेरिकेकडून करण्यात आलाय. ज्यानंतर जगाला धक्का बसला आहे. अखेर त्यांनी भारताला टॅरिफ लावण्याचे खरे कारण सांगितले आहे. रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर निर्बंध लादल्याचा दावा करण्यात आला आहे.

रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर निर्बंध लादले असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांची सचिव कॅरोलिन लेविट यांनी म्हटले. व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी लेविट यांनी म्हटले, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी रशिया आणि युक्रेन युद्ध संपवण्यासाठीच भारतावर निर्बंध लादले आहेत. रशियावर दबाव आणण्यासाठी ही आमची रणनीती होती. भारतावर टॅरिफ लावल्यानंतर पुतिन यांनी पहिला फोन भारताला केला आणि काही वेळ पुतिन आणि नरेंद्र मोदी यांच्यात संवाद झाला.

भारतावर अमेरिकेने टॅरिफ का लावला याचे कारण आता पुढे आले. डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील भेटीनंतर अमेरिका आता भारतावरील टॅरिफचा निर्णय बदलणार का? हे पाहण्यासारखे दिसणार आहे. मात्र, डोनाल्ड ट्रम्प हे भारताला टॅरिफवरून धमकावत आहेत. त्यांचे धमकावणे कमी झाले नाहीये. युक्रेन आणि रशिया युद्धाचा तोडगा काढला जात आहे आणि दोन महत्वाच्या बैठकी देखील पार पडल्या आहेत.

अमेरिकेने सध्या भारतावर 25 टक्के टॅरिफ लावला आहे. 27 ऑगस्टपासून अजून 25 टक्के लावला जाणार आहे. भारताने अमेरिकेच्या अटी मान्य केल्या नाहीत. मात्र, जर भारताने 25 टक्के अजून टॅरिफ हा भारतावर लावला तर त्याचा थेट परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. अनेक देशांनी अमेरिकेच्या टॅरिफच्या विषयावरून भारताला पाठिंबा दिला आहे. चीन देखील भारताच्या मदतीला धावून आल्याचे बघायला मिळत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.