पूर्व हवेलीतील शाळांमध्ये झेंडावंदन
esakal August 20, 2025 12:45 PM

उरुळी कांचन, ता. १६ : कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील महालक्ष्मी एज्युकेशन सोसायटी पुणे, संचलित मातोश्री रमाई आंबेडकर प्राथमिक व माध्यमिक निवासी आश्रमशाळेत स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. दत्तात्रेय गोते, चंद्रकांत यादव, इतिहास अभ्यासक खलिल शेख, परिवर्तन क्रांती सेनेचे अमोलभाऊ लोंढे, शिवप्रतिष्ठानचे शेखर अप्पा काळभोर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश काकडे, सुनील तुपे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी कवायत संचलन केले. प्राचार्या शबाना शेख यांनी प्रास्ताविक, तर माधुरी सुपेकर व अमोल शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. हनुमंत केदार, कलाशिक्षक शिवराज साने, प्रवीण कांबळे, वासुदेव बारी, मीना खंडागळे, जयश्री बळवंत, शकील शेख, आवेझ शेख, रसूल शेख यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
उरुळी कांचन येथील उन्नती कन्या विद्यालयात ‘ऑपरेशन सिंदूर’ यावर आधारित कॉलोनल सोफिया कुरेशी व विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्या नेतृत्वावर प्रकाश टाकून विविध नृत्य, भाषणे सादर केली. यावेळी आयएएस अधिकारी मंजिरी मनोलकर, संस्थापक सुरेश कांचन, अध्यक्षा नयॉन कांचन, मुख्याध्यापिका डॉ. नूपुर कांचन आदी उपस्थित होते.
आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान संचलित न्यू इंग्लिश स्कूल अष्टापूर विद्यालयात शाळा समितीचे सदस्य विजय कोतवाल यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. विद्यालयातील माजी विद्यार्थिनी दिव्या कोतवाल हिची पोलिस दलात निवड झाल्याने तिचा सत्कार करण्यात आला.
शिंदवणे येथील संत यादव बाबा माध्यमिक विद्यालयात ‘हर घर तिरंगा’ याविषयावर रांगोळी स्पर्धा आयोजित केली होती. डॉ. रवींद्र भोळे यांनी ध्वजवंदन केले. यावेळी विद्यार्थ्यांची भाषणे, सांस्कृतिक कार्यक्रम आणि देशभक्तिपर गीत विद्यार्थ्यांनी सादर केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.