मृत गोविंदाच्या कुटुंबीयांना प्रकाश सुर्वेंकडून अर्थसहाय्य
मुंबई, ता. १९ : तारामती चॅरिटेबल ट्रस्ट आणि युवा सेना कार्यकारिणी सदस्य राज सुर्वे यांच्यातर्फे आयोजित मागाठाणे दहीकाला महोत्सवात सराव करताना महेश रमेश जाधव (वय ११) या बाळगोपाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्या मुलाच्या परिवाराला पुढील भविष्यासाठी आणि या दुःखातून बाहेर येण्यासाठी मागाठाण्याचे शिवसेना आमदार प्रकाश दादा सुर्वे यांनी मदत म्हणून पाच लाख रुपयांचा धनादेश महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जाधव कुटुंबीयांना दिला.