कर्मचारी आरोग्य योजनेचा २० हजार कामगारांनी घेतला लाभ
esakal August 20, 2025 05:45 PM

तळेगाव दाभाडे, ता. १९ ः मावळ तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रातील अल्प उत्पन्न गटातील २० हजार कामगारांनी कर्मचारी आरोग्य योजनेचा लाभ घेतला आहे, अशी माहिती तळेगाव शाखा प्रबंधक अनुराधा टाकळीकर यांनी दिली.
तळेगाव शाखेअंतर्गत मावळ तालुक्यातील दहा हजार आस्थापनांनी नोंदणी केली असून, त्यातील २० हजार कामगारांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेअंतर्गत विमाधारक व त्यांच्या कुटुंबीयांना वैद्यकीय उपचार, तज्ज्ञांचा सल्ला, औषधे, निदान सेवा, रुग्णवाहिका सुविधा, आजारपण व गंभीर आजारांवरील आर्थिक मदत, गर्भधारणा व बाळंतपणातील लाभ, अपंगत्व व मृत्यू झाल्यास साहाय्य, फॅमिली प्लॅनिंग सुविधा तसेच बेरोजगारी भत्ता अशा विविध सुविधा मिळतात, असे प्रबंधक टाकळीकर यांनी सांगितले. तालुक्यातील औद्योगिक आस्थापनांनी आपापल्या ठिकाणी आरोग्य शिबिरे आयोजित करण्याचे आवाहन प्रबंधक अनुराधा टाकळीकर आणि गुणवंत कामगार संदीप पानसरे यांनी केले आहे.
---

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.