रक्तदाब ही स्त्रियांमध्ये विशेषतः मेनोपॉजनंतर, गर्भावस्था किंवा तणावात जास्त दिसते. वाढलेला रक्तदाब हृदयरोग व स्ट्रोकचा धोका वाढवतो, त्यामुळे तो नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे.
जास्त मीठ टाळा, पोटॅशियमयुक्त फळे-भाज्या खा आणि प्रक्रिया केलेले अन्न कमी करा. हिरव्या भाज्या व फळांमधील पोषक तत्त्वे रक्तदाब नियंत्रित ठेवतात.
दररोज किमान ३० मिनिटे मध्यम व्यायाम (जसे की चालणे, जॉगिंग, योगा, स्वीमिंग) करा. तसेच शवासन, अनुलोम-विलोम, पद्मासन अशी योगासने आणि प्राणायाम यामुळे ताण कमी होतो आणि रक्तदाब स्थिर राहतो.
जास्त वजन हे उच्च रक्तदाबाचे एक प्रमुख कारण आहे. बॉडी मास इंडेक्स (BMI) २५ पेक्षा कमी ठेवण्याचा प्रयत्न करा.
स्त्रियांमध्ये तणावामुळे रक्तदाब वाढण्याची शक्यता जास्त असते. मेडिटेशन, डीप ब्रीदिंग एक्सरसाईज, संगीत ऐकणे किंवा छंदांमध्ये गुंतून राहणे यामुळे तणाव कमी होतो.
दररोज ७-८ तास झोप घ्या. झोपेच्या अभावामुळे कोर्टिसॉल हार्मोन वाढते, ज्यामुळे रक्तदाब वाढू शकतो.
चाळीशीनंतर दर सहा महिन्यांनी रक्तदाब तपासा. आनुवंशिकतेनुसार किंवा इतर आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
लसूण, आले, मेथीदाणे, कढीपत्ता यांचा नियमित सेवन केल्यास रक्तदाब नियंत्रणात मदत होते.