Rabies Death From Dog Saliva : सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली-NCR मध्ये सर्व भटक्या कुत्र्यांना रस्त्यावरून डॉग शेल्टर होममध्ये पाठवण्याचे आदेश दिले. त्याविरोधात लोक रस्त्यावर उतरले. पण याचवेळी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कुत्रा चावल्याने वेळेवर इलाज न झाल्यास काय होते, याचे वृत्त तुम्ही वाचले अथवा पाहिले असतील. पण कुत्र्याने दोन वर्षांच्या बाळाच्या जखमेला चाटल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. अदनान नावाच्या 2 वर्षांच्या मुलाचा रेबीजमुळे मृत्यू ओढावला. या कुत्र्याने बाळाची एक जखम जिभेने चाटली होती. कुटुंबाने त्याकडे दुर्लक्ष केले. हा हलगर्जीपणा मुलाच्या जीवावर उठला.
कुत्र्याने चाटली जखम
कुत्र्याने एक महिन्यापूर्वी मोहम्मद अदनान याच्या पायावर एक जखम झाली होती. ती कुत्र्याने चाटली होती. त्यानंतर हा मुलगा पाण्याला घाबरायला लागला आणि त्याने पाणी पिणेच बंद केल्याने कुटुंबाला संशय गेला. या लक्षणाला हायड्रोफोबिया म्हणतात. मुलाची तब्येत बिघडल्यावर त्याला सार्वजनिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तिथे दुसऱ्या दिवशीच हे मुल दगावले. या घटनेने कुटुंबालाच नाही तर त्या परिसराला मोठा धक्का बसला. या गावातील जवळपास दोन डझन लोकांना रुग्णालयात आणून त्यांना रेबीजचे इंजेक्शन देण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांचं पथक या गावात पोहचले आणि त्यांनी रेबिजची कारणं, लक्षणं,परिणाम आणि उपायांची माहिती दिली.
उत्तर प्रदेशातील बदायू जिल्ह्यातील गावात ही घटना घडली. त्यानंतर डॉक्टरांचे पथक गावात दाखल झाले. त्यांनी गावकऱ्यांना रेबिजची माहिती दिली. केवळ कुत्रा चावल्यानेच नाही तर कुत्रा चाटल्याने सुद्धा रेबीजचा धोका होऊ शकतो असा दावा त्यांनी केला. त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. या गोष्टींकडे कानाडोळा करू नका असा दावा त्यांनी केला. अशा प्रसंगात लागलीच रेबीजचे इंजेक्शन घ्यावे असा सल्ला डॉक्टरांनी दिला.
रेबीज काय आहे?
रेबीज एक असा आजार आहे, जो मेंदू आणि मज्जासंस्थेला प्रभावित करतो. हा आजार जीवाणूंमुळे होतो. त्याचे नाव रॅपटो व्हायरस असे आहे. कुत्रा चावला अथवा तो चाटला जरी तरी त्यामुळे हा आजार पसरतो. अशा आजारामुळे मृत्यू पण ओढावू शकतो. कुत्र्याच्या लाळेत रेबिज व्हायरस असू शकतो. हा व्हायरस जखम, मेम्ब्रेन (डोळे,तोंड,नाक) यांच्या संपर्कात आल्यावर मनुष्यात संक्रमित होऊ शकतो आणि त्यामुळे जीव जाऊ शकतो.