डासांमुळे HIV व्हायरस पसरतो का? एक्सपर्ट काय म्हणाले? वाचा…
GH News August 20, 2025 06:17 PM

दरवर्षी 20 ऑगस्ट रोजी जागतिक मच्छर दिन साजरा केला जातो. डासांमुळे होणाऱ्या आजारांपासून बचाव करण्यासाठी जागरूकता निर्माण करणे हे या दिवसाचे उद्दिष्ट्य आहे. आपल्या सभोवताली असणारे डास अनेक प्रकारचे आजार पसरवतात. यात ताप, डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया सारख्या गंभीर आणि जीवघेण्या आजारांचा समावेश आहे. मात्र डासांमुळे HIV हा जीवघेणा आजार पसरतो का? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. आज आपण या प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत.

एचआयव्ही विषाणू डास चावल्यामुळे पसरू शकतो का?

पावसाळ्यात डासांच्या संख्या वाढते. डास चावल्याने डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया यासारखे जीवघेणे आजार होतात. या आजारांच्या व्यतिरिक्त HIV व्हायरस या आजारीची भीती देखील आहे. एचआयव्ही विषाणू डास चावल्यामुळे पसरू शकतो का? जर एखाद्या व्यक्तीला HIV ची लागण झालेली असेल आणि त्याला चावलेला डास दुसऱ्या व्यक्तीला चावल्यास हा विषाणू पसरतो का? असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. याबद्दल तज्ज्ञांकडून माहिती जाणून घेऊयात.

लोकांच्या मनात गैससमज

डास अनेक संसर्गजन्य रोग पसरवतात, त्यामुळे डास चावल्याने एचआयव्ही होऊ शकतो असा गैरसमज अनेकांच्या मनात आहे. मात्र वैद्यकीय तज्ज्ञ हा गैरसमज चुकीचा असल्याचे म्हणातात. कारण एचआयव्ही हा आजार डासांच्या चावण्यामुळे पसरत नाही. जीटीबी रुग्णालयातील डॉ. अजित कुमार यांनी म्हटले की, ‘एचआयव्हीचा प्रसार तेव्हाच होतो जेव्हा संक्रमित व्यक्तीचे रक्त किंवा शुक्राणू थेट दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात जातात. त्यानंतर हा विषाणू शरीराच्या पेशींवर हल्ला करतो आणि त्यांची संख्या कमी करतो.

डासांपासून HIV चा धोका नाही

डॉ. अजित कुमार यांनी पुढे म्हटले की, ‘डास त्यांच्या शरीरात एचआयव्हीचा विषाणू जास्त काळ जिवंत ठेवू शकत नाहीत किंवा तो मानवी शरीरात हस्तांतरित करू शकत नाहीत. जागतिक आरोग्य संघटनेनेही डास एचआयव्ही पसरवू शकत नाहीत अशी माहिती दिलेली आहे. मात्र डासांमुळे इतर जीवघेणे आजार मात्र पसरतात. त्यामुळे डासांपासून स्वतःचे संरक्षण करणे महत्वाचे आहे. यासाठी घराच्या आसपास पाणी साठू देऊ नका, तसेच रात्री झोपताना मच्छरदाणी वापरा यामुळे तुमचे संरक्षण होईल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.