अपुऱ्या झोपेमुळे वजन वाढते का?
Marathi August 20, 2025 08:26 PM

निरोगी राहण्यासाठी पोषणयुक्त आहारासोबत, पुरेशी झोप घेणे गरजेचे असते. डॉक्टरांच्या मते, निरोगी राहण्यासाठी दररोज किमान 7 तासांची झोप आवश्यक आहे. पण, हल्लीचे धावपळीचे रुटीन बघता अनेकांची झोप पूर्ण होत नाहीय. काहींना कामामुळे जागावे लागत आहे तर काहीजण मोबाईल, टिव्ही पाहत जागे राहत आहेत. अपुरी झोप आरोग्यावर परिणाम करणारी आहे, हे आपणा सर्वांना माहीत आहे. पण, नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनातून असे सांगण्यात येत आहे की, अपुऱ्या झोपेचा वजनावर परिणाम होत आहे.  या संशोधनात अपुऱ्या झोपेचा आणि वजनाचा थेट संबंध सांगण्यात आला आहे.

संशोधन काय सांगते?

अपुऱ्या झोपेमुळे थकवा, चिडचिड होतेच याशिवाय त्याचा थेट परिणाम आपल्या वजनावरही होत आहे. या संशोधनात असे दिसून आले आहे की, कमी झोपल्याने शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात. तसेच भूकेचे हार्मोन्स असंतुलित होतात आणि शरीराची मेटाबॉलिजम क्रिया मंदावते. परिणामी, आपण जास्त प्रमाणात खातो आणि वजन वाढू लागते. अपुऱ्या झोपेचे शरीरावर आणखी काय परिणाम होतात, जाणून घेऊयात.

  • अपुऱ्या झोपेमुळे ग्रेलिन आणि लिप्टन हे दोन्ही हार्मोन्स असंतुलित होतात. त्यातील ग्रेलिन या हार्मोनला भुकेचे हार्मोन म्हटले जाते. ग्रेलिन शरीरात तेव्हा तयार होते जेव्हा झोप पूर्ण होत नाही. याउलट लेप्टिन अपुऱ्या झोपेमुळे कमी होते. ज्यामुळे तुम्हाला वारंवार भूक लागते.
  • कमी झोपेमुळे शरीर थकलेले राहते. ज्यामुळे उर्जा मिळवण्यासाठी आपण जंक फूड खातो, कोल्ड्रिंक्स पितो. अशा अस्वास्थकर खाण्यामुळे वजन वाढण्याची शक्यता जास्त असते.
  • अपुऱ्या झोपेमुळे कोर्टिसोल नावाचा स्ट्रेस हार्मोन वाढतो. जेव्हा शरीरात कोर्टिसोल नावाचा हार्मोन वाढतो तेव्हा भूक वाढते.
  • अपुऱ्या झोपेमुळे वजन तर वाढतेच शिवाय हृदयरोग, डायबिटीसचा धोका संभवतो. तसेच पचनसंस्थेवरही परिणाम होऊ शकतो.

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाय –

  • कमीत कमी 7 तासांची झोप घ्यावी.
  • झोपण्यापूर्वी गॅझेट्स वापरू नयेत.
  • अल्कोहोन टाळावे.
  • व्यायाम करावा.
  • शरीर हायड्रेट ठेवावे.

 

 

हेही वाचा –

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.