सचिन बनसोडे
संगमनेर (अहिल्यानगर) : तुमच्या कार्यकर्त्यांनी कीर्तनात गोंधळ केला नसता; तर भंडारे महाराजांना तसे वक्तव्य करण्याची वेळच आली नसती. नाकर्तेपणामुळे लोकांनी थोरातांना घरी बसवल्याने ते वैफल्यग्रस्त झालेत. जनतेने तुमच्या हातात खुळखुळा दिलाय, तो खेळत बसा; अशा शब्दात आमदार अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर पलटवार केला आहे.
संगमनेरयेथे बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ आज मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चादरम्यान झालेल्या टिकेला आमदार अमोल खताळ यांनी प्रतिउत्तर दिले आहे. आमदार अमोल खताळ म्हणाले, कि आजचा मोर्चा म्हणजे माझाच माईक आणि माझच ऐक होता. मोर्चात भगव्या टोप्या आणि झेंडे दिसले या गोष्टीचे स्वागत आहे. मात्र हिंदुत्व बेगडी नसावं, असेही ते म्हणाले.
Nanded Flood : सहा दिवसापासून गावांचा संपर्क तुटलेला; वैद्यकीय पथक बोटीद्वारे गावात दाखल, गरोदर महिलेचे रेस्क्यूथोरातांना त्या गोष्टीचे दुःख
४० वर्षात संगमनेरची विस्कटलेली घडी आठ महिन्यात बसवली असून अशांत असणारे संगमनेर आता कुठेतरी शांत झाले आहे. बाळासाहेब थोरात यांना याचे दुःख आहे. नाकर्तेपणामुळे लोकांनी थोरातांना घरी बसवले आहे. तुमच्या परिवारातील लोक सोडून तुम्हाला दुसरं कुणी चांगलं दिसत नाही. मी कुणाच्या हातचं खेळणं नाही. मात्र जनतेने तुमच्या हातात जो खुळखुळा दिला आता तो खेळत बसा आणि पुढील काळात आत्मपरीक्षण करा; अशा शब्दात देखील आमदार खताळ यांनी निशाणा साधला आहे.
Ganesh Festival : गणेश विसर्जनानिमित्त वाहतुकीत बदल; माणकोली पुलावर वाहतुकीला बंदी; विसर्जनाचे चार दिवस असणार पर्यायी मार्गते व्हिडीओ एडिट केलेले
संगमनेरच्या सभेत बाळासाहेब थोरात यांनी भंडारे महाराजांविरोधात पुरावे म्हणून दाखवलेले व्हिडीओ एडिट केलेले होते, असा पलटवार आमदार अमोल खताळ यांनी केला. टोलनाक्याचा मालक कोण आहे? हे सर्व संगमनेरकरांना माहिती आहे. माझ्या बाबतीत देखील अनेक फेक पोस्ट बनवून ते व्हायरल करतात. पराभवातून खचल्यामुळे त्यांच्या थोरात यांच्याकडून संगमनेर अशांत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका खताळ यांनी केली.