-संतोष आटोळे
इंदापूर: इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर गावच्या हद्दीत पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर क्रुझर आणि अज्ञात वाहनांमध्ये झालेल्या अपघातात एक महिला जागीच ठार झाले असून दहा ते बारा जण गंभीर झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सर्व गंभीर हे कर्नाटक राज्यातील विजापूर येथील आहेत.
Satara Rain update: 'कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला'; दरवाजे १३ फुटांवर स्थिर, पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांची भेटयाबाबत अधिक माहिती अशी की गुरुवार (ता.21) रोजी पहाटे क्लुझर गाडी (क्रमांक के.ए.33 ए. 8572) वरील चालक श्रीकांत कुलगैरी (वय 30 वर्षे) हा त्याच्या ताब्यातील क्लुझर गाडी पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने घेऊन येत असताना वाहतुकीचे नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवित घेवुन जात असताना लोणी देवकर (ता.इंदापुर जि. पुणे) गावच्या हद्दीत गाडीची समोरील अज्ञात वाहनास पाठीमागुन जोरदार धडक बसली.
यावेळी क्रुझर गाडीमध्ये चालकासह 14 जण होते.त्यापैकी यल्लावा चौंडकी (वय ५० वर्षे रा. सिंडगी रोड संदगीनाका, आल्लापुर ओनी विजापुर, विजापुर रेल्वे स्टेशन राज्य कर्नाटक) या महिलेचा जागीच मृत्यू झाला.तर इतर 13 प्रवाशांमध्ये काही गंभीर जखमी झाले आहेत तशी प्राथमिक माहितीत असून त्यांना इंदापूर आणि भिगवण येथील शासकीय तसेच खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
Satara Bribery Case: 'सातारा बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंत्यासह मदतनीस लाचलुचपतच्या जाळ्यात'; जिल्हा परिषदेत खळबळदरम्यान अपघाताबाबतची माहिती मिळताच पोलिसांसह स्थानिक ग्रामस्थ सचिन डोंगरे, शेखर देवकर,अभिजीत गायकवाड यांनी अपघात स्थळी धाव घेत जखमींना उपचारकामी हलवण्यासाठी मदत केली.