1 'लपंडाव' ही स्टार प्रवाहवरील नवी मालिका आहे.
2 चेतन वडनेरेने सायली संजीवबद्दलच्या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं.
3 कृतिका देव आणि चेतन वडनेरे ही नवी जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
स्टार प्रवाहवर लवकरच एक मालिका सुरु होणार आहे. लपंडाव ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. यामध्ये 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री रुपाली भोसले असणार आहे. तर कृतिका देव आणि चेतन वडनेरे यांची नवी जोडी प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. दरम्यान चेतन वडनेरे यांच्यासोबत सायली संजीव दिसणार होती. स्टार प्रवाह वाहिनीच्या एका कार्यक्रमात दोघे एकत्र दिसले होते. मग अचानक सायली संजीवला का रिप्लेस केलं? असा प्रश्न चाहत्यांना मनात निर्माण झाला.
दरम्यान नुकतीच चेतन वडनेरे याने 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने सायली संजीवबद्दल होत असलेल्या चर्चेवर भाष्य केलय. चेतन म्हणाला की, 'ही ती मालिका नाही जी सायली करणार होती. ही दुसरी मालिका आहे जी आता पुढे पोस्टपोन झाली आहे. ती मालिका आता हिंदीत येत असल्याने आमचा प्रोजेक्ट पुढे ढकलण्यात आला. त्यामुळे दुसरा एक शो होता. त्यामध्ये मला अभिनय मिळाला. हा प्रोजेक्ट पुर्णपणे वेगळा आहे. आणि सायलीसोबत करत असलेल्या कामाचा प्रोजेक्ट पुर्णपणे वेगळा आहे.'
चेतन वडनेरे हा मूळचा नाशिकचा आहे. 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेतून तो प्रेक्षकांच्या घराघरात पोहचला. सायली सुद्धा नाशिकचीच असल्याने त्यांना आता ही जोडी पाहण्याची उत्सुकता होती. त्यामुळे सायलीला रिप्लेस करुन कृतिकाला आणण्यात आलं अशी चर्चा झालीय.
View this post on InstagramA post shared by Star Pravah (@star_pravah)
ही 'लपंडाव' मालिका 15 सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत कृतिका सखीच्या भूमिकेत तर चेतन हा ड्रायव्हरच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. तर आई कुठे काय करते फेम रुपाली सखीच्या आईच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षकांच्या कथा पहाण्याची उत्सुकता लागली आहे.
दरम्यान चेतन वडनेरे बद्दल बोलायचं झालं तर 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेतून तो प्रेक्षकांच्या घराघरात पोहचला. चाहत्यांना त्याला भरभरुन प्रेम दिलं त्यामुळे त्याला पुन्हा पाहण्याची चाहत्यांना उत्सुकता लागली होती. चेतन आणि सायली दोघेही नाशिकचे असल्याने चाहत्यांना दोघांना एकत्र पाहण्याची इच्छा होती.
FAQs
'लपंडाव' मालिकेत सायली संजीव होती का?
नाही, चेतन वडनेरेने स्पष्ट केलं की सायली ही या मालिकेचा भाग नव्हती.
सायली संजीवला रिप्लेस केलं का?
नाही, सायलीचा वेगळा प्रोजेक्ट होता जो हिंदीत पुढे ढकलण्यात आला आहे.
'लपंडाव' मालिकेत मुख्य भूमिका कोण करणार?
चेतन वडनेरे आणि कृतिका देव या नव्या जोडीला प्रेक्षक पाहणार आहेत.
रूपाली भोसलेची भूमिका काय आहे?
'आई कुठे काय करते' फेम रूपाली भोसलेही या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
योगिता चव्हाणच्या नव्या गणेशगीताचा धडाका! ‘शंकराचा बाळ आला’गाण्यात सैनिक आईच्या भूमिकेत, सोशल मीडियावर व्हायरल