Crime News : आजकाल घटस्फोटाचे प्रमाण फारच वाढले आहे. छोट्या-मोठ्या कारणामुळे नवरा-बायको आता थेट न्यायालयाकडे विभक्त होण्याची मागणी करताना दिसत आहेत. सध्या मात्र महिलेने एक अजब दावा करून थेट घटस्फोटाची मागणी केली आहे. या मागणीवर न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. घटस्फोटाची मागणी करत या महिलेने तिच्या नवऱ्याकडे पोटगी म्हणून तब्बल 90 लाख रुपयांची मागणी केली होती. विशेष म्हणजे न्यायालयाने पोटगीची ही मागणी फेटाळून लावली असून थेट पतीच्या बाजूने निकाल दिला आहे. या महिलीने माझा पती लैंगिकदृष्ट्या सक्रिय नसल्याचा दावा केला होता.
90 लाखांच्या पोटगीची मागणी फेटाळून लावलीतेलंगणातील उच्च न्यायालयाने महिलेच्या या मागणीवर निकाल दिला आहे. या महिलेने आपल्या पतीवर नपुंसक असल्याचा आरोप केला होता. मात्र आरोप करणारी महिला तिचा पती नपुंसक असल्याचा दावा सिद्ध करून शकणारे ठोस पुरावे सादर करू न शकल्याचे सांगत त्या महिलेची 90 लाखांच्या पोटगीची मागणी फेटाळून लावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार महिला आणि आरोपी पुरुष यांच्यात 2013 साली लग्न झालं होतं. हैदरबादमध्ये त्यांचा विवाहसोहळा संपन्न झाला होता.
डॉक्टरांनी सांगितले पतीवर उपचार होऊ शकत नाहीतमाझ्या पतीने तो नपुंसक असल्याचे माझ्यापासून लपवले होते. लग्न झाल्यानंतर पहिल्याच दिवसापासून माझा नवरा शरीरसंबंध ठेवण्यास असमर्थ होता. आम्ही मधुचंद्रासाठी केरळ तसेच काश्मीरमध्ये गेलो होतो. तिथेही हीच समस्या होती, असा आरोप महिलेने केला होता. 2015 साली ती नवऱ्यासोबत अमेरिकेत गेली होती. तिथे डॉक्टरांनी माझ्या नवऱ्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र तुमच्या पतीवर कोणतेही उपचार होऊ शकत नाहीत, असे डॉक्टरांनी सांगितले होते, असेही या महिलेने न्यायालयात सांगितले आहे. दरम्यान, या सर्व बाबी समोर आल्यानंतर माझे मानसिकदृष्ट्या खच्चीकरण झाले. तसेच नवा संसार सुरू करण्याचे माझे स्वप्न धुळीस मिसळले, अशी खंतही तिने न्यायालयापुढे मांडली होती.
पतीने काय दावा केला?तर दुसरीकडे आमचा प्रेमविवाह आहे. भारत आणि अमेरिका अशा दोन्ही देशांत माझे वैवाहिक जीवन चांगले होते. सुरुवातीला आम्हाला अडचण आली. पण उपचार केल्यानंतर माझी लैंगिक समस्य दूर झाली. या काळात मी पत्नीला आर्थिक मदत केली. मी पत्नीच्या बँक खात्यावर 28 लाख रुपये पाठवले होते. माझ्या पत्नीने पैशांच्या लालसेतून हा आरोप केला आहे, असा दावा तक्रारदार महिलेच्या पतीने काला.
न्यायालयाने काय निर्णय दिला?दरम्यान, दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. संबंधित आरोपी पतीच्या इम्पोटन्सी टेस्टमध्ये काहीही ठोस निकाल आलेला नाही. तसेच पतीचा स्पर्म काऊंटही बरोबर आहे, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. तसेच पती शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ होता तर मग पीडित महिलेने लग्नाच्या पाच वर्षांनंतर घटस्फोटासाठी अर्ज का केला? लवकर अर्ज का केला नाही? अशी शंका उपस्थित करत महिलेची 90 लाखांच्या पोटगीची मागणी फेटाळून लावली.