भारतीय जनता पक्षाची स्थापना 6 एप्रिल 1980 रोजी झाली. एकेकाळी केवळ 2 खासदारांचा पक्ष असलेला आज जगातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे.
याच पक्षाचे नेते नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांना पंतप्रधान बनलेत. तर सध्या अनेक राज्यात भाजपचे मुख्यमंत्री आहेत.
भाजपची नाळ जनसंघाशी जोडलेली असून 1980 मध्ये जनसंघाच्या सदस्यांनीच भारतीय जनता पक्षाची स्थापना केली.
महत्वाची बाब म्हणजे भाजपने कमळ हे पक्ष चिन्ह म्हणून स्वीकारायच्या आधी. संस्थापक सदस्यांनी पक्षासाठी इतर 3 चिन्हांचे पर्याय सुचवले होते.
संस्थापक सदस्यांपैकी एक असलेले नानाजी देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने पक्षासाठी कोणती चिन्हं सुचवली होती ते जाणून घेऊया.
संस्थापक सदस्यांच्या समितीने भाजपसाठी 'वर्तुळात जळती मशाल' आणि वर्तुळातील सुर्य ही चिन्हं सुचवली होतं.
यासह गाईची धार काढणारा शेतकरी, अशी तीन चिन्ह या समितीने निवडणूक आयोगाकडे पाठवली होती. तर भाजपच्या स्थापनेआधी जनसंघाचं चिन्ह दिवा हे होतं.
भाजपच्या संस्थापक सदस्यांमध्ये अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, विजयराजे सिंधिया, नानाजी देशमुख, के.आर मलकानी यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश होता.
अटलबिहारी वाजपेयी यांनी पक्षाला भारतीय जनता पक्ष हे नाव सुचवलं. या नावाला प्रचंड बहुमताने पाठिंबा मिळाल्यामुळे तेच पुढे लागू करण्यात आलं.