‘कर्मवीर’मध्ये नशामुक्ती समुपदेशन
विरार, ता. २१ (बातमीदार) ः जूचंद्र येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व एस. पी. ज्युनिअर महाविद्यालय नशामुक्त प्रदेश अभियान राबविण्यात आले. याअंतर्गत विद्यार्थ्यांना समुपदेशन करण्यासाठी व महिला तक्रार निवारण समितीअंतर्गत मुलींना मार्गदर्शन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमासाठी नायगाव पोलिस स्थानकाच्या पोलिस निरीक्षक मनीषा पाटील, उपनिरीक्षक बाबाजी चव्हाण, व्यसनमुक्ती सामाजिक कार्यकर्ते अक्षय भालेराव उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रायगड विभागाचे सहाय्यक विभागीय अधिकारी व विद्यालयाचे प्राचार्य विलासराव जगताप यांनी भूषविले. विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक संजय म्हात्रे यांनी नशा व त्याचे दुष्परिणाम याविषयी विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले. अभियानांतर्गत विद्यार्थ्यांची नशामुक्तीची प्रतिज्ञा घेण्यात आली.