swt2113.jpg
86063
सावंतवाडीः चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
‘रोहिदास भवन’ दोन वर्षांत पूर्ण करू
सुजित जाधवः सावंतवाडीत चर्मकार समाजातर्फे गुणगौरव
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २१ः समाजातील युवकांची एक मजबूत फळी तयार करून त्यांना उच्च शिक्षणासाठी मार्गदर्शन करणार असल्याची घोषणा सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुजित जाधव यांनी येथे केली. यासाठी शासनाकडून पाच लाख रुपयांचा निधी प्रस्तावित असल्याची माहिती त्यांनी दिली. आगामी दोन वर्षांत ओरोस हुमरमळा येथे असलेले संत रोहिदास समाज भवन पूर्ण करण्याचा मानसही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या सावंतवाडी शाखा विद्यार्थी गुणगौरव व सत्कार समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. सावंतवाडी शाखा उपाध्यक्ष आणि जिल्हा मंडळाचे सहसचिव बाबुराव चव्हाण यांच्या हस्ते दीपप्रजलनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावंतवाडी तालुकाध्यक्ष विनायक चव्हाण होते. प्रमुख पाहुणे जिल्हा बँकेचे संचालक आत्माराम ओटवणेकर, एलआयसी मुख्य अभियंता रवीकिशोर चव्हाण, सावंतवाडी पंचायत समिती सहाय्यक गटविकास अधिकारी मंगेश जाधव, शाखेचे सल्लागार परशुराम चव्हाण, जिल्हा सदस्य नरसू रेडकर, जिल्हा सदस्य संजना चव्हाण, माजी तालुकाध्यक्ष गणेश म्हापणकर, माजी जिल्हा उपाध्यक्ष लवू चव्हाण, माजी जिल्हा खजिनदार विजय चव्हाण, माजी तालुका सचिव गुंडू चव्हाण, तालुका सचिव जगदीश चव्हाण, खजिनदार सूर्यकांत सांगेलकर, उपाध्यक्ष शरद जाधव, कल्याण कदम, नरेश कारिवडेकर, राजेश फोंडेकर, संजय बांबुळकर, महादेव पवार, प्रशांत निरवडेकर, प्रवीण साळगावकर, संभाजी कांबळे, सुनील तुळसकर, महिला सदस्य ऋतुजा सरंबळकर, लक्ष्मण आरोसकर, सुधाकर बांदेकर, विजय ओटवणेकर, अॅड. परशुराम चव्हाण आदी उपस्थित होते.
बाबुराव चव्हाण यांनी, गेली ३२ वर्षे मी समाजकार्यात असून यापुढेही राहीन, असे सांगितले.
रवीकिशोर चव्हाण यांनी स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पालकांनी आपल्या मुलांकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन केले. लवू चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. विनायक चव्हाण यांनी भविष्यात समाज बांधवांची व्यवसायाला लागणारी पारंपरिक शस्त्रांची ओळख करून देणारे प्रदर्शन भरवणार असून तरुणांची संघटना मजबूत करणार असल्याचे सांगितले.
यावेळी तालुक्यातील सुमारे ७५ गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. पदोन्नती मिळविलेल्यांमध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक शेखर दाभोलकर, एसटी महामंडळाच्या आगार व्यवस्थापकपदी कुडाळ येथे नियुक्ती झालेले प्रवीण साळगावकर यांच्यासह डॉक्टर्स, इंजिनियर, दहावी-बारावी गुणवंत विद्यार्थी, माजी सैनिक चंद्रकांत पवार यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला.