वडवली पुनर्वसन शाळेत आधुनिक व सुसज्ज ग्रंथालयाचे लोकार्पण
esakal August 22, 2025 03:45 PM

वडवली पुनर्वसन शाळेत आधुनिक व सुसज्ज ग्रंथालयाचे लोकार्पण
कासा, ता. २१ (बातमीदार) ः जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा वडवली पुनर्वसन येथे बुधवारी (ता. २०) आधुनिक व सुसज्ज ग्रंथालयाचे लोकार्पण उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या कार्यक्रमाला तालुक्याचे सहाय्यक गटविकास अधिकारी प्रदीप डोलारे, गटशिक्षणाधिकारी निमिष मोहिते आणि यशराज रिसर्च फाउंडेशनच्या अध्यक्षा दिपाली भानुशाली यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यशराज रिसर्च फाउंडेशनने तालुक्यातील २५ शाळांमध्ये दर्जेदार वाचन साहित्याने समृद्ध ग्रंथालये उभारण्याचा उपक्रम हाती घेतला होता. यानुसार वडवली पुनर्वसन शाळेत नव्याने स्थापन झालेल्या ग्रंथालयात आवश्यक फर्निचर (टेबल, खुर्च्या, कपाटे), आकर्षक पेंटिंग, घड्याळ, स्टेशनरी, चटया यांसह ग्रंथालय चालविण्याची संपूर्ण प्रणाली उपलब्ध केली आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांना पुस्तके घरी नेऊन वाचन करण्याची सुविधाही या ठिकाणी देण्यात आली आहे. लोकार्पण प्रसंगी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना या सुविधेचा पूर्ण लाभ घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशराज रिसर्च फाउंडेशनचे प्रोग्राम लीड नामदेव गुलदगड यांनी केले. कार्यक्रमाचा उद्देश राजेश वाघात यांनी स्पष्ट केला. सूत्रसंचालन संजय प्रधान यांनी केले, तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर पाटील यांनी मानले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.