Vikram Solar IPO Allotment : शेअर्स मिळाले का? वाटपाची स्थिती अशी तपासा, ग्रे मार्केटमध्ये मोठा प्रतिसाद
मुंबई : विक्रम सोलर आयपीओमध्ये शेअर्सचे वाटप आज शुक्रवारी २२ ऑगस्ट २०२५ रोजी अंतिम होईल. गुंतवणूकदारांकडून उत्तम प्रतिसाद आणि ५६ पेक्षा जास्त वेळा सबस्क्रिप्शन मिळाल्यानंतर गुरुवारी आयपीओ बंद झाला. Vikram Solar IPO १९ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट या कालावधीत सबस्क्रिप्शनसाठी खुला होता. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) कडून मिळालेल्या माहितीनुसार, आयपीओ ला ४,३९,३२,४८५ शेअर्सच्या तुलनेत २,४७,८८,१०,५१० शेअर्सचे सबस्क्रिप्शन मिळाले.
Vikram Solar IPO Allotment कसे तपासायचे
Vikram Solar IPO वाटप अंतिम झाल्यानंतर गुंतवणूकदार बीएसई, एनएसई किंवा रजिस्ट्रारच्या अधिकृत वेबसाइट एमयूएफजी इनटाइम इंडिया वेबसाइट (पूर्वी लिंक इनटाइम इंडिया) वर वाटप स्थिती तपासू शकतात.
BSE वर विक्रम सोलर IPO वाटप तपासण्याची प्रक्रिया
१. विक्रम सोलर IPO वाटप किंवा कोणत्याही कंपनीचे IPO वाटप तपासण्यासाठी, प्रथम https://www.bseindia.com/investors/appli_check.aspx वर जा.
२. वेबसाइटला भेट दिल्यानंतर तुम्हाला Issue Type अंतर्गत दोन पर्याय मिळतील. तुम्हाला त्यात Equity वर क्लिक करावे लागेल.
३. यानंतर पुढील पर्याय issue name नावाने येईल. यामध्ये तुम्हाला तुमच्या IPO चे नाव निवडावे लागेल.
४. हे सर्व केल्यानंतर दिलेल्या बॉक्समध्ये तुमचा अर्ज क्रमांक सबमिट करा. तुम्ही तुमच्या पॅन कार्डची माहिती देखील भरू शकता.
५. यानंतर, 'सर्च' वर क्लिक करा आणि विक्रम सोलर IPO वाटपाची स्थिती तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
तुम्ही रजिस्ट्रारच्या वेबसाइट https://ipo.bigshareonline.com/ipo_status.html वर विक्रम सोलर IPO वाटपाची स्थिती देखील तपासू शकता.
विक्रम सोलर आयपीओ जीएमपी
विक्रम सोलर आयपीओचे नॉन-लिस्टेड शेअर्स शुक्रवारी ग्रे मार्केटमध्ये जोरदार प्रीमियमवर व्यवहार करत आहेत. बाजारातील घडामोडींवर लक्ष ठेवणाऱ्या सूत्रांनी सांगितले की, विक्रम सोलर आयपीओ शेअर्स प्रति शेअर ३७७ रुपयांवर व्यवहार करत होते. हे ३३२ रुपयांच्या आयपीओच्या वरच्या किंमत पट्ट्यापेक्षा ४५ रुपये जास्त आहे आणि १३.५५% अदिक आहे.
आयपीओ लिस्टिंग
विक्रम सोलरचे शेअर्स मंगळवार, २६ ऑगस्ट २०२५ रोजी बीएसई आणि एनएसईवर सूचीबद्ध होऊ शकतात. ग्रे मार्केटमधील सध्याचे ट्रेंड कंपनीच्या शेअर्ससाठी अनुकूल लिस्टिंग दर्शवत आहेत. सध्याचा जीएमपी कायम राहिला तर कंपनीचे शेअर्स आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना लिस्टिंगवर १३ टक्क्यांहून अधिक परतावा देऊ शकतात.