swt2110.jpg
86049
मडुराः बनुताई पै यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना कृष्णा करमळकर. सोबत भिकाजी धुरी, श्रीकृष्ण भोगले व अन्य.
मडुऱ्यातील निबंध स्पर्धेत
विर्तिका, गौरी गावडे प्रथम
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २१ः मडुरा येथील सार्वजनिक वाचनालयात श्रीमती बनुताई पै यांचा स्मृतीदिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात बनुताईंच्या प्रतिमेला ग्रंथालयाचे कार्यवाह भिकाजी धुरी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी ग्रंथालयाचे उपाध्यक्ष कृष्णा करमळकर, श्रीकृष्ण भोगले, मडुरा हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सायली परब, सुवर्णा मडुरकर आणि नागेश सावंत उपस्थित होते.
वाचनालयाने आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. ही स्पर्धा दोन गटांत घेण्यात आली. गुणानुक्रमे निकाल असा ः लहान गट (पाचवी ते सातवी)-विर्तिका शेर्लेकर (शेर्ले केंद्रशाळा), चैतन्या रेडकर (शेर्ले शाळा), अश्विनी पंडित (कास क्र. १). मोठा गट (आठवी ते दहावी)-गौरी गावडे (कास क्र. १), आर्या गवस (मडुरा हायस्कूल), शर्वरी परब (मडुरा हायस्कूल). सर्व विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिक, प्रशस्तिपत्रक आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. आदर्श वाचक म्हणून बाल विभागातून मंजिरी पवार आणि प्रौढ वाचक म्हणून सुवर्णा मडुरकर यांनाही गौरविण्यात आले. यावेळी करमळकर गुरुजींनी बनुताईंच्या आठवणींना उजाळा दिला. आभार ग्रंथपाल मृणाल पंडित यांनी मानले.