भारत संरक्षण क्षेत्रात दिवसेंदिवस प्रगती करत आहे. भारताच्या अग्नी-5 या क्षेपणास्त्राची चर्चा जगभरात सुरु आहे. या मिसाईलची ताकद आणि रेंजमुळे जगभरातील भल्या-भल्या देशांना घाम फुटला आहे. अग्नी-5 मुळे चीन आणि पाकिस्तानसह रशिया, इराक, सौदी अरेबियासारख्या देशांची चिंता वाढली आहे. आगामी काळात युद्ध झाल्यास अण्वस्त्रांनी सुसज्ज असलेले हे मिसाईल काही मिनिटांतच वरील देशांवर हल्ला करू शकते. अलिकडेच अग्नी-5 चे प्रक्षेपण ओडिशाच्या चांदीपूर येथे पार प़डले. हे क्षेपणास्त्र हिंदी महासागरात प्रक्षेपित करण्यात आले आहे.
भारताचे अग्नी-5 हे क्षेपणास्त्र सर्वात घातक क्षेपणास्त्रांपैकी एक आहे. यात 7.5 ते 8 टन वजनाचे जड वॉरहेड आहे. हे क्षेपणास्त्र दोन प्रकारे वापरले जाऊ शकते. पहिला प्रकार म्हणजे एअरबर्स्ट. याचा अर्थ या क्षेपणास्त्राचा हवेत स्फोट होईल आणि त्याचे परिणाम जमिनीवर होतील. यामुळे रनवे, एअरबेस आणि रडार सिस्टम पूर्णपणे नष्ट होईल.
अग्नी-5 वापरण्याचा दुसरा प्रकार म्हणजे ते बंकर बस्टर बॉम्बसारखेही काम करते. हे जमिनीच्या आत 80 किमी पर्यंतचे टार्गेट नष्ट करू शकते. याचा वापर शत्रूच्या भूमिगत कमांड सेंटर किंवा अण्वस्त्रे साठवलेल्या ठिकाणांना नष्ट करण्यासाठी केला जाण्याची शक्यता आहे. तसेचत अग्नि-5 क्षेपणास्त्र 90 अंशात तीव्र वळण घेऊनही हल्ला करू शकते. या मिसाईलचे वजन 50 टन आहे आणि रेज सुमारे 5 हजार किमी आहे.
अग्नी-5 हे क्षेपणास्त्र संपूर्ण चीन आणि पाकिस्तानवर हल्ला करण्यास सक्षम आहे. त्याचबरोबर हे क्षेपणास्त्र पूर्वेकडील जपान, उत्तरेकडील दक्षिण रशिया, पश्चिमेकडील इराक आणि सौदी अरेबिया, तसेत दक्षिणेकडील ऑस्ट्रेलियाच्या वायव्य समुद्रावर हल्ला करु शकते. तसेच हे दक्षिण आशियासह बऱ्याच देशांना उद्ध्वस्त करण्यात सक्षम आहे. त्यामुळे आगामी काळात युद्धाची परिस्थिती निर्माण झाल्यास या अग्नी-5 क्षेपणास्त्राच्या मदतीने भारत शत्रूंवर हल्ला करु शकतो. या क्षेपणास्त्रामुळे भारताची ताकद कित्येक पट वाढलेली आहे.