आशिया कप 2025 स्पर्धेचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. इंग्लंड दौऱ्यानंतर टीम इंडिया विश्रांतीवर असल्याने भारतीय चाहत्यांना आशिय कप स्पर्धेची प्रतिक्षा आहे. आगामी टी 20i वर्ल्ड कप 2026 च्या पार्श्वभूमीवर यंदा आशिया कप स्पर्धेत 20 षटकांचे सामने होणार आहेत. या स्पर्धेत 8 संघ भिडणार आहेत. 4 संघांना एका गटात यानुसार 8 संघ 2 गटात विभागण्यात आले. यूएईकडे या स्पर्धेचं यजमानपद आहे. ए ग्रुपमध्ये यूएईसह टीम इंडिया, पाकिस्तान आणि ओमानचा समावेश आहे. तर ब गटात श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि हाँगकाँगचा समावेश आहे.
आतापर्यंत या स्पर्धेसाठी पाकिस्तान आणि भारत या 2 देशांनीच क्रिकेट संघ जाहीर केला आहे. हे दोन्ही संघ अ गटातीलच आहे. त्यानंतर आता बी ग्रुपमधील हाँगकाँगने टीम जाहीर केली आहे. हाँगकाँग अशाप्रकारे या स्पर्धेसाठी संघ जाहीर करणारा तिसरा देश ठरला आहे. या संघात हाँगकाँगचे कमी आणि मूळ भारतीय खेळाडूच जास्त आहे. त्यामुळे सोशल मीडियावर हाँगकाँग ही इंडियाची बी टीम असल्याचं मजेत म्हटलं जात आहे.
हाँगकाँगने आशिया कप स्पर्धेसाठी 20 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. यासिम मुर्तूझा हा हाँगकाँगचं नेतृत्व करणार आहे. तर बाबर हयात याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी आहे. बाबर हयात टी 20i आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात शतक करणारा पहिला आणि एकूण दुसरा फलंदाज आहे. बाबरने 2016 साली टी 20 आशिया कपमध्ये ओमान विरुद्ध शतक केलं होतं. तर विराटने अफगाणिस्तान विरुद्ध 2022 मध्ये शतक केलं होतं. त्यामुळे बाबर यंदा कशी कामगिरी करतो? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
9 सप्टेंबर, विरुद्ध अफगाणिस्कान, अबुधाबी
11 सप्टेंबर, विरुद्ध बांगलादेश, अबुधाबी
15 सप्टेंबर, विरुद्ध श्रीलंका, दुबई
आशिया कप 2025 स्पर्धेसाठी हाँगकाँग टीम : यासिम मुर्तझा (कर्णधार), बाबर हयात (उपकर्णधार), जीशान अली (विकेटकीपर), शाहिद वासिफ (विकेटकीपर), नियाजाकत खान मोहम्मद, नसरुल्ला राणा, मार्टिन कोएत्झी, अंशुमन रथ, एहसान खान, कल्हान मार्क चल्लू, आयुष आशीष शुक्ला, मोहम्मद एजाज खान, अतीक उल रहमान इकबाल, किंचित शाह, आदिल महमूद, अनस खान, हारून मोहम्मद अरशद, अली-हसन, गजनफर मोहम्मद आणि मोहम्मद वाहीद.