हिंदू धर्मरक्षणासाठी संघटित होणे गरजेचे
esakal August 24, 2025 11:45 AM

-rat२३p१४.jpg-
२५N८६५४९
राजापूर ः हिंदू धर्मसभेमध्ये बोलताना जगद्गुरू रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्य महाराज.
-----
हिंदू धर्मरक्षणासाठी संघटित व्हा
नरेंद्राचार्य महाराज ः राजापुरात हिंदू धर्मसभा
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २३ ः हिंदू संस्कृती ही साधुसंतांची संस्कृती आहे. त्यामागे शास्त्र, विज्ञान आणि सामाजिक दृष्टिकोन आहे. हिंदू संस्कृतीसह हिंदू धर्मरक्षणासाठी हिंदूंनी जागृत होत संघटित होणे गरजेचे आहे, असे आवाहन जगद्गुरू रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांनी केले. जागृत होत संघटित होण्यासाठी घाबरलात तर आपल्याच देशामध्ये अल्पसंख्याक व्हाल, असा इशाराही त्यांनी साऱ्यांना दिला.
राजापूर तालुका सकल हिंदू समाजाच्या वतीने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन सभागृहामध्ये विराट हिंदू धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप, सागर बेग उपस्थित होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.