Asia Cup 2025: 'माणसाच्या जीवाची किंमत शून्य; IND vs PAK सामना पाहाणार नाही', माजी क्रिकेटपटू बरसला
esakal August 24, 2025 06:45 PM
  • आशिया कप २०२५ स्पर्धा ९ सप्टेंबरपासून UAE मध्ये सुरू होत आहे.

  • भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना १४ सप्टेंबरला दुबईत होणार आहे.

  • परंतु माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीने या सामन्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

आशिया कप २०२५ स्पर्धेला ९ सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता साधारण दोनच आठवड्याचा कालावधी या स्पर्धेसाठी राहिला असून सर्व संघांच्या तयारीला सुरुवात झाली आहे.

भारताचा संघही या स्पर्धेसाठी जाहीर झाला आहे. मात्र, तरीही अद्याप या स्पर्धेतील भारत - पाकिस्तान सामन्यावर प्रश्नचिन्ह आहे. भारताच्या माजी क्रिकेटपटूने तर हा सामनाच पाहणार नसल्याचे म्हटले आहे.

मोदी सरकारचा मोठा निर्णय! Asia Cup 2025 स्पर्धेतील India vs Pakistan लढत होणार की नाही? फैसला झाला

भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आशिया कप २०२५ च्या साखळी फेरीत ओमान आणि युएईसह एकाच गटात आहेत. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान संघात १४ सप्टेंबर रोजी दुबईत सामना खेळवला जाणार आहे. पण पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांचे संबंध बिघडले आहेत. ज्याचा परिणाम विविध क्षेत्रांवर पडताना दिसत आहे. यात क्रीडा क्षेत्राचाही समावेश आहे.

भारतीय संघाने आशिया कप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध खेळू नये, अशी मागणी सध्या अनेकांनी केली आहे. दरम्यान, क्रीडा मंत्रालयाने याबाबत निर्णय दिला आहे, त्यानुसार भारत आणि पाकिस्तान संघात द्विपक्षीय मालिका होणार नाहीत.

पण आंतरराष्ट्रीय आणि बहुपक्षीय स्पर्धांच्या संदर्भात, भारत आंतरराष्ट्रीय क्रीडा संघटनांच्या प्रथा व आपल्या खेळाडूंचं हित लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल. त्यामुळे सध्या तरी आशिया कप स्पर्धेतील भारत - पाकिस्तान सामन्यासाठी भारत सरकारकडून परवानगी मिळाली आहे.

दरम्यान असे असले तरी भारताचा माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीने या सामन्याबाबत निराशा व्यक्त केली असून त्याने म्हटले आहे की तो हा सामना पाहणार नाही.

त्याने एएनआयशी बोलताना म्हटले की 'हा सामना होणार आहे, हे ऐकून मला थोडं आश्चर्य वाटलं. पहलगाम हल्ल्यात अनेक निरपराध नागरिकांचे प्राण गमावले होते. त्यानंतर सुरू झालेल्या युद्धानंतर सर्वत्र चर्चा होती की यावेळी आपण चोख उत्तर देऊ. यानंतरही काही महिन्यात सर्वकाही विसरले आहेत. मला खरंच विश्वास ठेवणं कठीण वाटत आहे की हा सामना होत आहे. इतकंच नाही तरी व्यक्तीच्या जीवाची किंमत शून्य ठरत आहे.'

Asia Cup 2025: भारतीय संघाची यूएईत जाण्याची तारीख ठरली, पण ट्रेनिंग कॅम्प नाही; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक, IND vs PAK...

तिवारी पुढे म्हणाला, 'पाकिस्तानविरुद्ध खेळून आपल्याला काय मिळवायचे आहे. माणसाच्या आयुष्याची किंमत खेळापेक्षा अधिक आहे. प्रश्नच नाही, मी हा सामना पाहाणार नाही.'

आशिया कप स्पर्धेत १० सप्टेंबर रोजी भारताला युएईविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे. दुसरा सामना पाकिस्तानविरुद्ध १४ सप्टेंबर रोडी खेळवला जाणार आहे. १९ सप्टेंबर रोजी ओमानविरुद्ध भारताला तिसरा साखळी सामना खेळायचा आहे.

FAQs

१. आशिया कप २०२५ मध्ये भारत-पाकिस्तान सामना कधी होणार आहे?

(When will India vs Pakistan match take place in Asia Cup 2025?)

→ १४ सप्टेंबर रोजी दुबईत आशिया कप २०२५ मध्ये भारत-पाकिस्तान सामना खेळवला जाणार आहे.

२. भारताचा आशिया कप २०२५ पहिला सामना कोणाविरुद्ध आहे?

(Who is India playing in their first Asia Cup 2025 match?)

→ भारताचा आशिया कप २०२५ पहिला सामना १० सप्टेंबर रोजी युएईविरुद्ध होणार आहे.

३. भारताचा आशिया कप २०२५ मधील तिसरा सामना कोणाविरुद्ध आहे?

(Who is India playing in their third match?)

→ भारताचा आशिया कप २०२५ मधील तिसरा सामना १९ सप्टेंबर रोजी ओमानविरुद्ध होईल.

४. माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीने भारत-पाकिस्तान सामन्याबाबत काय मत व्यक्त केले?

(What did former cricketer Manoj Tiwari say about the match?)

→ माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीने म्हटले की तो भारत-पाकिस्तान सामना पाहणार नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.