पवनी (जि. भंडारा) : शहरापासून तीन किमी अंतरावरील कन्हाळगाव मार्गावर सेलारी मंदिराजवळ दोन दुचाकींची धडक झाल्याने एकाचा मृत्यू झाला, तर, तिघे गंभीर जखमी झाले. उमेश धनराज कावळे(वय ४५) असे मृताचे नाव आहे.ही दुर्घटना आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी पवनी पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहितीनुसार पवनी येथील गोविंदा बिसन मुंडले (वय ६५) व मनोज गोविंदा मुंडले (वय ३०) हे शेतातून मोटारसायकलने (क्रमांक एमएच ३६/डीडी २६९८) पवनीकडे परत येत होते.
दरम्यान पवनीकडून कन्हाळगावकडे जाणारे दुचाकीस्वार उमेश धनराज कावळे (वय ४५) व अंकित विजय सहारे (वय ३०) यांच्या दुचाकींमध्ये वळणार समोरासमोर धडक झाली. या अपघातात चारही जण ही गंभीर जखमी झाले.
Tractor Truck Accident: कारंजा मूर्तिजापूर मार्गावर ट्रक ट्रॅक्टरच्या भीषण अपघातात एक ठारत्यांना तत्काळ रुग्णवाहिकेतून ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉ. समीर सय्यद यांनी प्राथमिक उपचार करून उमेश कावळे, गोविंदा मुंडले, मनोज मुंडले यांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले, तर अंकित सहारे याच्यावर ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहे.भंडारा येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान उमेश धनराज कावळे याचा मृत्यू झाले असून पुढील तपास पवनी पोलिस करीत आहेत.