Actor Death: रुग्णालयात दाखल केलं पण...; प्रसिद्ध अभिनेता आणि भाजप नेत्याचे निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा
Saam TV August 26, 2025 04:45 AM

Actor Passes Away: प्रसिद्ध बंगाली अभिनेते आणि भाजप नेते जॉय बॅनर्जी यांचे निधन झाले आहे. ते ६० वर्षांचे होते. दीर्घकाळ आजारी असल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही काळापासून ते डायबेटिससह विविध आजारांनी त्रस्त होते. त्यांच्यावर कोलकात्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, परंतु प्रकृती खालावल्याने त्यांचे निधन झाले.

माहितीनुसार, जॉय बॅनर्जी यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने १५ ऑगस्ट रोजी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी) होता. त्यांची प्रकृती हळूहळू बिघडत गेली आणि गेल्या काही दिवसांपासून त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते. मात्र, सर्व प्रयत्न करूनही त्यांना वाचवता आले नाही.

Parineeti Chopra: परिणीती चोप्रा-राघव चड्ढाच्या घरी येणार नवा पाहुणा; क्यूट स्टाईलमध्ये दिली गुड न्यूज

जॉय बॅनर्जी हे बंगाली चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय नायक होते. त्यांनी १९८० च्या दशकात अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले आणि अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्यांच्या अभिनयातील सहजता आणि देखण्या व्यक्तिमत्त्वामुळे ते अनेक प्रेक्षकांच्या आवडीचे झाले. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक हिट चित्रपटांत भूमिका केल्या आणि सिनेरसिकांच्या मनात कायमस्वरूपी ठसा उमटवला.

Parineeti Chopra: परिणीती चोप्रा-राघव चड्ढाच्या घरी येणार नवा पाहुणा; क्यूट स्टाईलमध्ये दिली गुड न्यूज

राजकारणातही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. ते भारतीय जनता पक्षात (BJP) सामील झाले आणि बंगालच्या राजकारणात त्यांनी आपली स्वतंत्र छाप पाडली. समाजकारण आणि जनतेशी असलेली त्यांची जवळीक यामुळे ते राजकीय पातळीवरही लोकप्रिय झाले होते.

जॉय बॅनर्जी यांच्या निधनाने बंगाली चित्रपटसृष्टीसह राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. अनेक नामवंतांनी सोशल मीडियावरून श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या जाण्याने बंगालनं एक लोकप्रिय अभिनेता आणि संवेदनशील नेता गमावला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.