Dream11 ची माघार, मग टीम इंडियाचा स्पॉन्सर कोण? Toyota सह तगडी कंपनी शर्यतीत; आशिया चषकापूर्वी BCCI ला लागणार लॉटरी?
esakal August 26, 2025 06:45 AM
  • ड्रीम ११ने ‘ऑनलाईन गेमिंग प्रमोशन अँड रेग्युलेशन बिल’ मंजूर झाल्यानंतर टीम इंडियाच्या प्रायोजकत्वातून माघार घेतली.

  • बीसीसीआयला आता आशिया चषक २०२५पूर्वी नवा टायटल स्पॉन्सर शोधावा लागणार आहे.

  • ड्रीम ११ने जुलै २०२३ मध्ये ३५८ कोटी रुपयांमध्ये मुख्य स्पॉन्सरशिप मिळवली होती; त्याआधी Byju’s स्पॉन्सर होते.

Who Will Replace Dream11? BCCI Sponsorship Race Heats Up : ड्रीम ११च्या माघारीनंतर आता बीसीसीआयने टीम इंडियासाठी नव्या टायटल स्पॉन्सरचा शोध सुरू केला आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांत "ऑनलाईन गेमिंग प्रमोशन अँड रेग्युलेशन बिल" मंजूर झाल्यानंतर ड्रीम ११ने ते आता भारतीय क्रिकेट संघाचे प्रायोजक राहणार नाहीत, असे BCCI ला कळवले.

आता ड्रीम ११ ने माघार घेतल्यामुळे ९ सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिराती ( UAE)मध्ये सुरू होणाऱ्या आशिया चषक २०२५ स्पर्धेपूर्वी बीसीसीआयला नवा स्पॉन्सर शोधण्याची वेळ आली आहे. NDTVच्या वृत्तानुसार, भारतीय संघाच्या स्पॉन्सरशिपसाठी दोन कंपन्यांनी रस दाखवला आहे. ड्रीम ११ ने जुलै २०२३ मध्ये ३५८ कोटी रुपयांमध्ये मुख्य स्पॉन्सर म्हणून बोली जिंकली होती. त्याआधी Byju's स्पॉन्सर होते.

भारतीय संघाला स्पॉन्सर करू शकणार नाही, Dream11ने मोडला BCCIसोबतचा करार; आशिया कपसाठी जर्सीवर कोणाचं नाव?

“Toyota Motor Corporation आणि एक फिनटेक स्टार्ट-अप यांनी स्पॉन्सरशिपसाठी रस दाखवला आहे. मात्र अधिकृत टेंडर प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही,” असे वृत्तात म्हटले आहे. आशिया चषकासाठी भारतीय संघाच्या जर्सी छापून झाल्या असून त्यावर ड्रीम ११चे नाव आहे. परंतु, या स्पर्धेत त्या जर्सी वापरल्या जाणार नाहीत.

बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी सांगितले की, “कायद्याने ज्याला मान्यता नाही, अशी गोष्ट आम्ही करणार नाही. केंद्र सरकार जी पॉलिसी ठरवेल, तिचे पालन बीसीसीआय करेल. ” ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या अहवालानुसार, ड्रीम ११चे अधिकारी मुंबईतील बीसीसीआयच्या कार्यालयात गेले होते आणि सीईओ हेमांग अमीन यांना आपला निर्णय कळवला.

Sanju Samsonचे ट्वेंटी-२०त वेगवान शतक; आता Asia Cup मध्ये त्याला सलामीला खेळवायचं की नाही, हे निवड समितीनं ठरवायचं...

“ड्रीम ११च्या प्रतिनिधींनी कार्यालयात येऊन आम्हाला कळवले की ते आता पुढे स्पॉन्सरशिपचा करार सुरू ठेवू शकणार नाहीत… त्यामुळे आशिया चषकासाठी ते संघाचे स्पॉन्सर राहणार नाहीत. लवकरच बीसीसीआय नवा टेंडर काढेल,” असे एका बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.