Georai News : बीडमधील गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित समर्थकांचा संताप; लक्ष्मण हाके यांच्या पुतळ्याचे दहन
esakal August 26, 2025 07:45 AM

गेवराई : बीडमधील गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांच्यावर परवा लक्ष्मण हाके यांनी ओबीच्याच दारात आले तर दंडुका हातात घेणार अशी टिका केल्याने काल रविवार आमदार पंडितांच्या संतप्त झालेल्या सर्मथकांनी प्रा. लक्ष्मण हाके यांच्या पुतळ्याला दंडुकाने मारहाण करून, पायाखाली तुडवत, जाळून टाकण्याचा प्रकार गेवराई शहरात केला.विशेष म्हणजे यात ओबीसी समर्थक सहभागी होते.

बीडच्या गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित व माजलगावचे जेष्ठ आमदार प्रकाश सोळंके या दोन्ही आमदारांवर लक्ष्मण हाकेनी प्रसार माध्यमातून जहरी टीका करून टारगेट केले. याचा जाहीर निषेध सोशल मिडियावर देखील मोठ्या प्रमाणात झालेला दिसून आला.एवढेच नाही तर रविवारी(ता २४)आमदार विजयसिंह पंडित यांच्या समर्थकांनी लक्ष्मण हाके यांच्या पुतळ्यास लाथा,चपलाने तुडवत व शिव्यांची लाखोली वाहत पुतळा जाळला, मराठा व धनगर समाजासह युवकांनी लक्ष्मण हाकेला झपाझप झापलं. यावेळी तुम्ही कोणाला बोलताय, काय बोलताय, विजयसिंह पंडित व हा अठरा पगड जातीसाठी २४ तास काम करणारा आमदार आहे.

विषय कोणत्याही जातीचा असो, सगळ्यात अगोदर रस्त्यावर, त्यांच्या हक्कासाठी लढण्यासाठी, आमदार पंडित असतात. मागच्या लोकसभेत निवडणुकीत पूर्ण जिल्ह्यामध्ये ओबीसी विरुद्ध ओपन अशी निवडणूक करण्यात आली. लोकसभा निवडणुकीत बीड जिल्ह्याच्या ओबीसीच्या नेत्यांना निवडून आणण्यासाठी आमदार पंडित व त्यांचे जेष्ठ बंधू माजी आमदार अमरसिंह पंडित अहोरात्र प्रयत्न करीत होते.

त्यावेळेस मराठा लोकांनी हेच म्हणावे आपण ओबीसीच्या सोबत उभे का राहीलात म्हणून, समाजाचा विषय वेगळा आणि राजकारण वेगळे, समाजाचा विषय हाके आपण राजकारणात आणू नका. गेवराईची संपूर्ण माहीती असेल तरच बोला, विजयसिंह पंडित व त्यांचे कुटुंबीय धनगर समाजातील खूप लोकांना, त्यांच्या सहकाऱ्यांना, त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न करत जिल्हा परिषद कित्येक सदस्य झाले, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, नगराध्यक्षाचा उमेदवार या समाजामधून दिला. जागोजागी या समाजाला न्याय देण्याचे काम विजयसिंह पंडित,अमरसिंह पंडित केले.

अठरा पगड जातीचे आमदारांच्या परिवारा सोबतच

विधानसभा निवडणुकीत आपणच गेवराई तालुक्यामध्ये पंडित यांच्या विरोधात सभा घेतली होती, परंतु आपल्याला कळलं असेल की या गेवराई तालुक्यातील १८ पगड जाती जमातीचे लोक विजयसिंह पंडित यांच्यावर अफाट प्रेम करतो. राहिला प्रश्न आपला जिल्ह्यामध्ये किंवा बाहेरून कोणाकडून तरी सुपारी घेऊन आपण केलेलं वक्तव्य दिसतोय. असं सांगत गेवराई तालुक्यातील जनता आपल्या वक्तव्याला. भीक घालणार नाही. विजयसिंह पंडित यांची वाढत चाललेल्या क्रेजला बघून कुणीतरी आपल्याला सुपारी दिली यात तीळमात्र शंका नाही असं सांगत उपस्थित युवकांनी टीकेची झोड उठवली.

मनोज जरांगे पाटील प्रामाणिक नेतृत्व

मनोज जरांगे-पाटील यांचा हा लढा गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी समाजाचा बनला आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे वातावरण दूषित करून समाजात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ नये हीच आमची प्रामाणिक भावना व्यक्त करत हा लढा न्यायासाठीचा आहे, हक्कासाठीचा आहे.आणि तो नक्कीच यशस्वी होईल अशी जनतेची ठाम भावना आहे. लक्ष्मण हाके यांनी आमदार विजयसिंह राजे पंडित यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केले होते. त्याचा निषेध म्हणून रविवारी गेवराई शहरात दिपक आतकरे, सोमनाथ गिरगे, मुक्ताराम अव्हाड, संजय दाभाडे, सुहास दाभाडे, स्वप्नील कोकाटे,पप्पू भुते,हेमंत दाभाडे, शिवाजी वाघमारे, प्रमोद राऊत, उदय पानखडे, विशाल थोरात, संतोष सुतार, अक्षय पंडित, महादेव वादे, मयूर गव्हाणे, धीरज गळगुंडे,आनंद सुतार, महेश बेदरे, अमित सौंदरमल, यश सौंदरमल, हरी खताळ, नाना चोरमले, ओम गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी लक्ष्मण हाके यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध व्यक्त केला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.