डॅन व्हॅन निएकेर्कने तिचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्तीचा निर्णय मागे घेतला.
मार्च २०२३ मध्ये तिने तंदुरुस्ती चाचणीत नापास झाल्यामुळे निवृत्ती घेतली होती.
निवृत्ती मागे घेतल्यानंतर तिने क्रिकेट दक्षिण आफ्रिकेची आणि क्रिकेट परिवाराची माफी मागितली.
Dané van Niekerk’s emotional apology to Cricket South Africa : दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाची स्टार डॅन व्हॅन निएकेर्कने तिचा निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे. ती पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. महिला क्रिकेटमधील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमधील एक असलेल्या निएकेर्कने मार्च २०२३ मध्ये निवृत्ती जाहीर केली होती. तंदुरुस्तीच्या चाचणीत नापास झाल्यामुळे तिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवडलेल्या संघातून वगळण्यात आले होते. त्यानंतर तिने हा निर्णय घेतला होता.
डॅन व्हॅन निएकेर्कने एक भावनिक पोस्ट लिहून तिचा निवृत्तीचा निर्णय मागे घेत असल्याचे सांगितले. तिने ही पोस्ट लिहिताना क्रिकेटदक्षिण आफ्रिकेची माफी मागितली. तिने या निर्णयाला तिच्या आयुष्यातील भावनिकदृष्ट्या गुंतागुंतीचा काळ असे संबोधले आणि पुन्हा संधी दिल्याबद्दल तिने मनापासून कृतज्ञता व्यक्त केली. स्वतःला पूर्ण ताकदीनिशी झोकून देण्याचं आश्वासन देताना, अथक परिश्रम घेणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. डॅन व्हॅन निएकेर्कने म्हटले की, “नवीन ऊर्जा, लक्ष आणि कृतज्ञतेच्या भावनेसह मी परतत आहे.”
“आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्तीचा निर्णय मागे घेतल्याची घोषणा करताना मला खूप आनंद होत आहे. निवृत्तीचा निर्णय घेतल्यानंतरच्या काळात मला माझ्या देशाचं प्रतिनिधित्व करण्याची किती उणीव भासते याची जाणीव करून दिली. पुन्हा एकदा ती संधी मिळावी म्हणून मी माझं सर्वस्व झोकून देण्यासाठी कटिबद्ध आहे,' असे तिने लिहिले.
तिने पुढे म्हटले की, मी माझ्या निवृत्तीचा निर्णय ज्या पद्धतीने हाताळणे अपेक्षित होते, तसे नाही केले. त्याबद्दल मी क्रिकेट साऊथ आफ्रिका आणि क्रिकेट परिवाराची मनापासून माफी मागते. आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा माझं कौशल्य सादर करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी अत्यंत कृतज्ञ आहे. या प्रवासात माझा साथ देणाऱ्या प्रत्येकाचे मनःपूर्वक आभार.
Why Chateshwar Pujara Retire? चेतेश्वर पुजाराने अचानक निवृत्ती का घेतली? समोर आली दोन मोठी कारणं३३ वर्षीय निएकेर्कने १ कसोटीत २२ धावा केल्या आहेत. त्याशिवाय १०७ वन डे सामन्यांत १ शतक व ९ अर्धशतकांसह २१७५ धावा, तर ८६ ट्वेंटी-२० सामन्यांत १८७७ धावा केल्या आहेत.