मुंबई : गणेशोत्सवात मुंबईतील लालबागचा राजा, गणेश गल्लीचा बाप्पा आणि चिंचपोकळीचा चिंतामणी या प्रसिद्ध मंडपांमध्ये दर्शनासाठी दरवर्षी लाखोंची गर्दी होते. यावेळीही भाविकांचा मोठा ओघ अपेक्षित असून करी रोड, चिंचपोकळी आणि कॉटन ग्रीन या स्थानकांवर प्रचंड गर्दी उसळते. ही गर्दी सुरळीत पार पाडण्यासाठी मध्य रेल्वेने विशेष व्यवस्था केली आहे.
रेल्वेप्रशासनाने अतिरिक्त तिकीट खिडक्या, मोबाईल-यूटीएस सेवा, तिकीट तपासणी कर्मचारी आणि सहाय्यक नेमले आहेत. गर्दी नियंत्रणासाठी सीएसएमटी, दादर, एलटीटी, ठाणे आणि पनवेल स्थानकांवर अधिकारी व तपासणी कर्मचारी २४ तास तैनात असतील. विशेष उद्घोषणा, बॅनर्स व स्टँडीज लावून प्रवाशांना योग्य माहिती मिळावी, याचीही सोय करण्यात आली आहे.
फळांवरील स्टिकरचा अर्थ काय? ९९ टक्के लोकांनी याबद्दल माहिती नाही... ३०६ विशेष गाड्यादरम्यान, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची प्रचंड गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने यंदा तब्बल ३०६ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मडगाव, सावंतवाडी रोड, रत्नागिरी, खेड, चिपळूण, पुणे, नागपूर अशा विविध ठिकाणांसाठी या गाड्या सुरू झाल्या आहेत. प्रवाशांचा प्रवास सुरक्षित, सुखकर आणि निर्विघ्न व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाने सर्व स्तरांवर तयारी केली आहे.
वैद्यकीय व्यवस्थागणेशोत्सवानिमित्त प्रशासनाने प्रवासी आणि भाविकांसाठी २५ ऑगस्टपासून राज्य आरोग्य अधिकाऱ्यांच्या समन्वयाने खेड, माणगाव, चिपळूण, संगमेश्वर, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी रोड स्थानकांवर प्रथमोपचार केंद्र स्थापन केले आहेत. त्याचबरोबर आपत्कालीन परिस्थितीसाठी चिपळूण आणि रत्नागिरी आरोग्य केंद्रांवर वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी परिचारिका तसेच आरोग्य कर्मचारी उपस्थित असणार आहेत.
Mumbai News: एमआयडीसीला उच्च न्यायालयाचा दिलासा, निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार वंदे भारतचे डबे वाढणारगणेशोत्सवाच्याकाळात प्रवाशांची होणारी प्रचंड गर्दी पाहता मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस ८ ऐवजी १६ डब्यांसह चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तात्पुरत्या स्वरूपात हि सेवा चालवण्यात येणार असून ही सेवा २५ ते ३० ऑगस्ट दरम्यान उपलब्ध असणार आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे कोकणात जाणाऱ्या हजारो प्रवाशांचा प्रवास अधिक सुकर आणि आरामदायी होणार आहे.