Amit Satam appointed as new Mumbai BJP President replacing Ashish Shelar : भाजपा नेते अमित साटम यांची मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आज मुंबईतील पत्रकार परिषदेत यासंदर्भातील घोषणा केली. त्यामुळे आशिष शेलार यांच्या ऐवजी आता अमित साटम ही जबाबदारी सांभाळणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकाही भाजपा आता अमित साटम यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याचं निश्चित झालं आहे.
अमित साटम यांची राजकीय कारकीर्दअमित साटम हे मुंबईतील अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार आहेत. त्यांनी 2014, 2019 आणि 2024 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवला आहे. साटम यांचा जन्म मुंबईत झाला असून त्यांनी व्यवस्थापन क्षेत्रात शिक्षण घेतलं आहे. राजकारणात येण्यापूर्वी ते व्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत होते.
Mumbai BJP President : अमित साटम मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष! प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची मोठी घोषणा...याशिवाय अमित साटम यांनी भाजपच्या युवा मोर्चाचे मुंबईतील सरचिटणीस आणि अध्यक्ष म्हणून काम केलं आहे. अमित साटम हे एक प्रभावी स्थानिक नेते म्हणून ओळखले जातात, मतदारसंघातील विकास आणि सामाजिक कार्यात त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे.
साटम यांची अध्यक्षपदी निवड करताना रविंद्र चव्हाण म्हणाले, मुंबई भाजपाच्या नव्या अध्यक्षाची निवड करण्यासाठी आज पक्षाची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सर्व पदाधिकारी आणि नेते उपस्थित होते. यावेळी सर्वानुमते अमित साटम यांच्या नाववर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.
BJP National President : भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी लागणारी अट अखेर पूर्ण! तिघांची नावं चर्चेत, कधी होणार घोषणा? देवेंद्र फडणवीसांकडून अभिनंदनया नियुक्तीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अमित साटम यांचे अभिनंदन केलं आहे. अमित साटम यांनी भाजपमध्ये संघटनात्मक जाबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. विधानसभेत अभ्यासू आणि आक्रमक म्हणून त्यांची प्रतिमा आहे. त्यांना मुंबईच्या प्रश्नांची जाण आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच येणाऱ्या काळात साटम यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिकेवर महायुतीची सत्ता येईल, असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.