टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यानंतर थेट आशिया कप 2025 स्पर्धेत खेळणार आहे. तर दुसर्या बाजूला या स्पर्धेआधी पाकिस्तान, यूएई आणि अफगाणिस्तान तिन्ही संघ टी 20i ट्राय सीरिज खेळणार आहेत. ही मालिका आणि आशिया कप स्पर्धा यूएईमध्ये होणार आहे. त्यामुळे या तिन्ही संघांना आशिया कपआधी या मालिकेमुळे मदत होऊ शकते. तर दुसऱ्या बाजूला श्रीलंका आशिया कपआधी झिंबाब्वे दौऱ्यात वनडे आणि टी 20i सारिज खेळणार आहे. श्रीलंका क्रिकेट टीम काही दिवसांपूर्वी झिंबाब्वेत दाखल झाली. त्यानंतर आता यजमान झिंबाब्वेने श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम जाहीर केली आहे.