बाया कर्वे प्रशिक्षण संस्थेत
टेरारियम कार्यशाळेला प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ : महर्षी कर्वे स्त्री शिक्षणसंस्था संचलित बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटतर्फे टेरारियम कार्यशाळेचे आयोजन मारुती मंदिर येथील संस्थेच्या कार्यालयात करण्यात आले. यामध्ये टेरारियम कशाप्रकारे बनवले जाते, इनडोअर प्लांट्स कशाप्रकारे वापरली जातात याबद्दलची माहिती सांगण्यात आली.
टेरारियम बनवण्यासाठी लागणारे साहित्य बीकेव्हीटीआयतर्फे उपलब्ध करून देण्यात आले. टेरारियममध्ये लागणारे मिनिएचर मॉडेल्स बनवण्यासाठी इंटेरियर डिझाईन डिपार्टमेंटच्या विद्यार्थिनींनीसुद्धा सहभाग घेतला होता. टेरारियमचा सुशोभीकरणासाठी कसा वापर करावा याचे मार्गदर्शन आणि टेरारियम बनवण्याचे प्रशिक्षण घेण्यात आले. कार्यशाळेत सिद्धी करंदीकर यांनी मार्गदर्शन केले. त्यात डॉ. राखी लांजेकर, रूपाली सावंत, योगिता वणजू, प्रतिभा खेडेकर, तृप्ती भुर्के यांनी सहभाग घेतला. अतिशय उत्साही आणि आनंदी वातावरणामध्ये ही कार्यशाळा झाली.