दरम्यान भारताकडून एकाही गोलंदाजाला टी 20 क्रिकेटमध्ये 500 विकेट्स घेता आलेल्या नाहीत. भारताकडून टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम युझवेंद्र चहल याच्या नावावर आहे. चहलने 326 सामन्यांमध्ये 380 विकेट्स घेतल्या आहेत. (Photo Credit : PTI)
विकेट घेतल्यानंतर मैदानात धावत सुटणारा दक्षिण आफ्रिकेचा माजी फिरकीपटू इमरान ताहीर चौथ्या क्रमांकावर आहे. ताहीरने 436 टी 20 सामन्यांमध्ये 554 विकेट्स मिळवल्या आहेत. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)
तसेच शाकिब अल हसन याने रविवारी या मानाच्या यादीत स्थान मिळवलं. शाकीबने 457 व्या सामन्यात 500 विकेट्सचा टप्पा पार केला. शाकिबच्या नावावर टी 20 क्रिकेटमध्ये एकूण 502 विकेट्स आहेत. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)
टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत विंडीजचा माजी ऑलराउंडर ड्वेन ब्राव्हो दुसऱ्या स्थानी आहे. ब्राव्होने 582 टी 20 सामन्यांमध्ये 631 फलंदाजांना बाद केलं आहे. ब्रोव्होने अनेक टी 20 लीग स्पर्धेत बॉलिगंसह बॅटिंगनेही आपली छाप सोडली आहे. (Photo Credit : CSK X Account)
टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम राशीद खान याच्या नावावर आहे. राशीदने आतापर्यंत 487 सामन्यांमध्ये 660 विकेट्स घेतल्या आहेत. राशीद अनेक टी 20 स्पर्धेत खेळतो. तसेच राशीद अफगाणिस्तानच्या टी 20i टीमचा कॅप्टनही आहे. (Photo Credit : PTI)
विंडीजचा स्पिनर सुनील नारायण याने गेल्या काही वर्षांत बॉलिगंसह बॅटिंगने आपला ठसा उमटवला आहे. सुनील टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. सुनीलने 557 सामन्यांमध्ये 590 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. (Photo Credit : PTI)