शिबिरात १८५ विद्यार्थी, शिक्षकांचे रक्तदान
esakal August 26, 2025 10:45 AM

पिंपरी, ता. २५ : डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या रक्तदान शिबिरात १८५ च्या वर विधार्थ्यांनी व शिक्षकांनी रक्तदान केले.
शिबिराचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. सुजित चिकुर्डेकर, प्रा. नीलेश येवले व प्रा. योगिता घाटोळ यांनी केले. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कमिटी मेंबर प्रा. सोनाली भोसले, प्रा. नितीन विभूते यांनी सहकार्य केले. या शिबिरासाठी संस्थेचे सचिव डॉ. सोमनाथ पाटील व संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. शिबिरासाठी प्राचार्य डॉ. रणजित पाटील, उपप्राचार्य डॉ. किशोर निकम, उपप्राचार्य प्रा. जयवंत बाबर यांनी मार्गदर्शन केले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.