Manoj Jarange: ओबीसी आरक्षणावर जरांगेंची दिशाभूल; समाजात फूट पाडत असल्याचा आरोप, ॲड. मंगेश ससाणे यांची मागणी
esakal August 26, 2025 11:45 PM

पुणे : ‘‘ओबीसी आरक्षण हे मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास आणि सर्वेक्षणावर आधारित आहे. आरक्षणाच्या नावाखाली मनोज जरांगे समाजात फूट पाडण्याचे काम करत आहेत,’’ असे मत ॲड. मंगेश ससाणे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. तसेच जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली.

पत्रकार परिषदप्रसंगी मृणाल ढोले पाटील यांच्यासह ओबीसी कार्यकर्ते उपस्थित होते. मनोज जरांगे यांची सत्ता उलथवून टाकण्याच्या मुद्द्यासह इतर मुद्द्यांवर ॲॅड. ससाणे आणि ओबीसी कार्यकर्त्यांनी भाष्य केले.

भाजपचा डीएनए ‘ओबीसी’ असून मनोज जरांगे यांचे आंदोलन ‘ओबीसीं’च्या हक्कांवर गदा आणणारे आहे. त्यांचा संघर्ष आरक्षणासाठी नसून, प्रस्थापित राजकीय फायद्यासाठी आहे, असा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला.

Ganesh Festival 2025: गणेशोत्सवासाठी तगडा बंदोबस्त; पोलिस, होमगार्ड, एसआरपीएफ जवानांसह साडेआठ हजार जण तैनात

ॲड ससाणे म्हणाले, ‘‘मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह भाषा वापरत आहेत. जरांगे यांच्या धमकीवजा भाषेमुळे कायदा सुव्यवस्थेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. सरकार त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा अंतर्गत गुन्हा का दाखल करत नाही?’’

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.