तू माझं काम सोपं केलंस….! चेतेश्वर पुजाराच्या निवृत्तीनंतर विराट कोहलीची पोस्ट चर्चेत, अश्विन म्हणाला…
GH News August 27, 2025 01:13 AM

टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेट चेतेश्वर पुजाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला आहे. 2023 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपपासून चेतेश्वर पुजारा कसोटी कसोटी संघातून बाहेर होता. संघात परतण्यासाठी प्रयत्नही सुरु होते. मात्र संघात काही जागा मिळाली नाही. अखेर त्याने क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली. या निर्णयानंतर क्रीडाप्रेमींनी त्याच्या कसोटी क्रिकेटच्या कारकि‍र्दीच्या आठवणींना उजाळा दिला. आता दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहलीने त्याला त्याच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. विराट कोहलीने पुजाराच्या निवृत्तीनंतर एक खास गोष्ट शेअर केली आहे. त्याने इंस्टाग्रामवर स्टोरीवर त्याचा आणि पुजाराचा फोटो शेअर केला आहे. तसेच एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्याने तू माझं काम सोपं केलं, असा मेसेज लिहिला आहे. विराट कोहलीनेही नुकतंच कसोटी क्रिकेटला रामराम ठोकला आहे. आता फक्त वनडे क्रिकेट खेळणार आहे. विराट कोहलीने पुजारासाठी अशी पोस्ट लिहिण्याचं कारण काय? चला जाणून घेऊयात…

पुजारासाठी विराट कोहली बोलला असं काही….

टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीने चेतेश्वर पुजाराच्या निवृत्तीनंतर त्याच्या क्रिकेट कारकि‍र्दीला सलाम ठोकला आहे. विराट कोहलीने इंस्टाग्रावर लिहिलं की, ‘नंबर 4 वर माझं कामं सोपं करण्यासाठी पुजारा तुझे आभार. तुझं करिअर खरंच खूप कमालीचं आहे. भविष्यासाठी तुला शुभेच्छा.. देव तुझं भलं करो..’ चेतेश्वर पुजाने तिसऱ्या क्रमांकावर जबरदस्त फलंदाजी केली आहे. त्याच्या आकडेवारीवरून ही बाब स्पष्ट होते. त्याची जागा भरून काढणं अजूनही टीम इंडियाच्या इतर खेळाडूंना जमलेलं नाही. पुजाराने 155 कसोटी डावात 44.41 च्या सरासरीने 6529 धावा केल्या. पुजाराने कसोटी क्रिकेटमध्ये या क्रमांकावर खेळताना 18 शतकं आणि 32 अर्धशतकं ठोकली. राहुल द्रविडनंतर या क्रमांकावर भारतासाठी त्याने केलेली कामगिरी सर्वोत्तम ठरली आहे.

माजी क्रिकेटपटू आर अश्विनने देखील पुजाराच्या खेळीचं कौतुक केलं आहे. त्याच्या निवृत्तीवर आर अश्विनने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अश्विनने सांगितलं की, कोहलीचे खूप साऱ्या धावा या पुजारामुळे झाल्या आहेत. अश्विनने युट्यूब चॅनेलवर सांगितलं की, ‘अनेक खेळाडू चर्चेत येत नाहीत. पण याचा अर्थ असा नाही की त्यांचं योगदान कमी होतं. पुजाराने नंबर 3 वर चांगली कामगिरी केली आहे. त्याने विराट कोहलीला खूप साऱ्या धावा करण्यास मदत केली आहे.’

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.