ग्रेटर नोएडा निक्की हत्याकांड प्रकरणात पती विपिन भाटीच एक घाणेरडं सत्य समोर आलय. ते ऐकून पोलीसही सून्न झालेत. विवाहित असूनही विपिनच्या एक नाही, तर दोन गर्लफ्रेंडस होत्या. दुसऱ्या गर्लफ्रेंडने तर विपिन विरोधात FIR नोंदवलेली. निक्कीशी लग्न झाल्यानंतर विपिनच बाहेर प्रेम प्रकरणं सुरु होतं. त्याने समोरच्या मुलीला लग्नाच आश्वासन दिलेलं. तो लग्नही करणार होता. पण त्याआधी प्रेयसीला समजलं की, विपिन विवाहित आहे.
गर्लफ्रेंडसोबत भांडण झाल्यानंतर विपिनने तिला खूप मारहाण केली होती. अखेरीस त्या मुलीने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन FIR नोंदवली. विपिननेत्या मुलीसोबत लग्न करण्यासाठी निक्कीला मार्गातून हटवण्याचा प्लान केलेला. त्याने एकदा करंट देऊन निक्कीचा जीव घेण्याचा प्रयत्न केलेला. पण सुदैवाने निक्की त्यावेळी बचावली.
डेट रिकव्हर करण्यासाठी एक्सपर्टची मदत
त्या मुलीने पोलीस स्टेशनमध्ये विपिन विरोधात तक्रार नोंदवलेली. पोलीस चौकशीनुसार, आरोपी विपिनने त्या मुलीसोबत अफेअर असल्याची कबुली दिली. पोलीस आता त्या युवतीची चौकशी करणार आहेत. आरोपी विपिनने अटक होण्याआधी फोन हिस्ट्री डिलीट केली. आता त्याच्या मोबाइलमधला डेट रिकव्हर करण्यासाठी पोलीस एक्सपर्टची मदत घेत आहेत.
कारमध्ये एक मुलगी बसलेली दिसते
याआधी सुद्धा आणखी एका मिस्ट्री गर्लची या केसमध्ये चर्चा झालेली. तिचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेला. व्हिडिओत विपिनच्या कारमध्ये एक मुलगी बसलेली दिसते. हा व्हिडिओ मागच्यावर्षीचा असल्याची चर्चा आहे. निक्कीने त्यावेळी विपिनला रंगेहाथ पकडलेलं.
निक्कीची माफी मागितलेली
निक्कीने विपिनला एका मुलीसोबत पकडल्यानंतर खूप वाद झालेला. निक्की आणि विपिनमध्ये जोरदार भांडण झालेलं. विपिनने बदनामी होईल म्हणून निक्कीची माफी मागितलेली. निक्कीचे काका राजकुमार यांनी ही माहिती दिली. हा वाद मागच्यावर्षीच झालेला. त्याचा व्हिडिओ सुद्धा आहे.
रात्र-रात्र तो घराबाहेर असायचा
निक्कीची बहिण कंचनने आरोप केला की, विपिनचे अनेक मुलींसोबत प्रेमसंबंध होते. रात्र-रात्र तो घराबाहेर असायचा. माझ्या बहिणीने या बद्दल त्याला जाब विचारला की, तो तिला मारहाण करायचा. रिपोर्टनुसार ग्रामीणांनी सांगितलं की, विपिन रात्रीचा डिस्कोला जायचा. काही कामही करत नव्हता.