भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) सप्टेंबर २०२५ साठी महागाई अपेक्षा सर्वेक्षण (IESH) सुरू केले आहे. या सर्वेक्षणाचा उद्देश देशभरातील १९ शहरांतील घरांकडून महागाई आणि किमतींबद्दल त्यांचे विचार जाणून घेणे आहे. आरबीआय दर तिमाहीला हे सर्वेक्षण करते. विविध वस्तूंच्या किमतींमध्ये होणाऱ्या बदलांबद्दल कुटुंबांच्या धारणा समजून घेणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
Mumbai News: पुलांवरून गणेश मिरवणूक नेताना काळजी घ्या, महापालिकेचे आवाहनमहापालिका क्षेत्रात मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील १२ पूल धोकादायक स्वरूपाचे आहेत. काही पुलांच्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत. तर काही पुलांची कामे पावसाळ्यानंतर सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे भाविकांनी श्रीगणेशाचे आगमन-विसर्जनाच्या मिरवणुकांदरम्यान या पुलांवरून जाताना काळजी घ्यावी. याबाबत महापालिका व मुंबई पोलिस यांच्या वतीने वेळोवेळी करण्यात येणाऱ्या सूचना व निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
Ganeshotsav: ठाकरे बंधू पुन्हा एकत्र! गणरायाच्या दर्शनासाठी उद्धव ठाकरे पोहोचणार राज ठाकरेंच्या घरीगणेशोत्सवानिमित्त (Ganeshotsav 2025) उद्या सकाळी 10 ते 11 वाजण्याच्या दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या घरी दीड दिवसाचा गणरायाचे आगमन होणार आहे. या गणेशोत्सवात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना गणपती दर्शनासाठी फोन करुन निमंत्रण दिलं असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सहपरिवार गणपतीचे दर्शन घेण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी उद्या जाणार आहेत, अशा चर्चा सुरु आहेत.
Mumbai News: मुंबईत लवकरच सुरू होणार बाईक-टॅक्सी सेवाराज्य परिवहन विभागाला निकष पूर्ण करणाऱ्या अॅग्रीगेटर फर्म आणि गटांकडून बाईक-टॅक्सी अर्ज प्राप्त झाले आहेत. राज्य परिवहन आयुक्त कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही आठवड्यात बाईक-टॅक्सी रस्त्यावर उतरतील. प्रवाशांची सुरक्षा, कारपूलिंग, परवाना आणि अॅग्रीगेटर वाहनांशी संबंधित वाहतूक उल्लंघनांबाबत त्वरित "तक्रार यंत्रणा" स्थापन करण्याची विभागाची योजना आहे.
Ajit Pawar: लंडनमध्ये उभारणार महाराष्ट्र भवन, ५ कोटींचा निधी मंजूर - अजित पवारलंडनमधील मराठी समुदायाला स्वतःचे सांस्कृतिक केंद्र मिळणार आहे, ही दीर्घकाळापासूनची मागणी होती. त्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. लंडनमधील महाराष्ट्र मंडळ हे समर्पित सांस्कृतिक स्थळ उभारण्यासाठी चर्च ऑफ इंग्लंडची इमारत विकत घेतली जाणार आहे. तर यासाठी ५ कोटी रूपये सरकारी मिळणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली.
Mumbai Live: माटुंगा येथे अॅक्टिवा-टॅक्सी अपघात, एक जखमीमाटुंग्यातील रुईया सिग्नलजवळ राम कुटीर इमारतीसमोर अॅक्टिवा (MH-01 BH-5301) आणि टॅक्सीची धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने सियॉन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मेल संजय असं अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून तो माटुंगा जिमखाना परिसरात राहणार आहे.
Pune Live: महापालिकेतील सुरक्षारक्षकांना मिळणार नवीन शस्त्रमहापालिकेच्या सुरक्षा विभागाला अधिक सक्षम करण्यासाठी सुरक्षारक्षकांना अत्याधुनिक शस्त्रे देण्याचा निर्णय घेण्यात आला, असा निर्णय महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी घेतला आहे. सध्या रक्षकांकडे असलेली शस्त्रे जुनी असून त्याऐवजी आधुनिक साधनसामग्री उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी आवश्यक तांत्रिक बाबी व अडचणींचा आढावा घेऊन पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
Sambhajinagar Live: शिवसेनेचे माजी महापौर त्र्यंबक तुपे यांचा शिवसेनेत प्रवेशउबाठा शिवसेनेचे माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी आज मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा शिवसेनेत पुन्हा पडझड सुरू झाली आहे.
Pune Live: पीएमपी चालकाला ह्रदयविकाराचा झटका, लक्ष्मी रस्त्यावरील घटनापुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरील बेलबाग चौकात पीएमपी चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. चौकात वाहतूक नियोजन करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात आल्याने त्यांनी त्वरित चालकाला रुग्णालयात नेत त्याचे प्राण वाचवले.
Pune Live Update: मतचोरी विरोधात पुण्यात काँग्रेसचे आंदोलनपुण्यात युवा काँग्रेसने मतचोरी विरोधात आंदोलन केले. बालगंधर्व चौकात झालेल्या आंदोलनात त्यांनी फडणवीस सरकारवर मतचोरी करण्याचा आरोप केला.तसेच राष्ट्रपतींनी यात लक्ष घालावे असं म्हटलं आहे.
Maharashtra Live: हुजूर साहिब नांदेड ते मुंबई, पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला मुख्यमंत्र्यांकडून हिरवा झेंडामहाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुजूर साहिब नांदेड ते मुंबई दरम्यानच्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला आहे.
Ayurveda Day Live: आयुर्वेद दिन आता दरवर्षी साजरा होणार २३ सप्टेंबरला२०१६ पासून आयुर्वेद दिन साजरा असून आता हा दिवस दरवर्षी २३ सप्टेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. यापूर्वी हा दिन धन्वंतरि जयंती (धनतेरस) रोजी साजरा केला जात होता, पण ठराविक तारीख निश्चित केल्याने आयुर्वेदाला जागतिक स्तरावर ओळख मिळेल.
एसटी कर्मचाऱ्यांचा पगार गणपती आधी होणार आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार गणेशोत्सवासाठी या महिन्यात लवकर केला जाणार होता. त्यामुळे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील एसटी कर्मचारी पगाराची फाईल मागच्या आठवड्यात वित्त विभागाकडे पाठवली होती आणि लवकर निधी देण्याचे मागणी केली होती. त्यास मागणीला यश आले आहे.
Delhi Live: फिजीचे पंतप्रधान राबुका यांनी राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घेतलीफिजीचे पंतप्रधान सितेनी लिगामामादा राबुका यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. राष्ट्रपती म्हणाले की, भारत पॅसिफिक आयलंड कंट्रीज (पीआयसी) सोबत आपले संबंध आणि विकास भागीदारी मजबूत करण्यासाठी वचनबद्ध आहे, ज्यापैकी फिजी हा एक विशेष भागीदार आहे.
Manipur Live: मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला यांना नागालँडचीही जबाबदारीउत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील कुलेसारा पुष्ता रोडवर कार आणि बाईकची टक्कर झाली. या अपघातात बाईकवरील चार मुलांचा मृत्यू झाला. पोलिसांनी कार जप्त केली आहे आणि चालकाला ताब्यात घेतले आहे.
Sambhajinagar Live : छत्रपती संभाजीमध्ये कार खड्ड्यात गेली, चालक गंभीर जखमीकारचालकाचे कार वरील नियंत्रण सुटल्याने कार थेट रस्त्यालगत असलेल्या खड्ड्यात गेली चालक मात्र किरकोळ जखमी
छत्रपती संभाजी नगर पुणे महामार्ग वर गोलवाडी फाटा येथे कारचा अपघात. छत्रपती संभाजी नगर कडून पुण्याकडे जात असताना गोलवाडी फाटा येथे कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट रस्त्यालगत असलेल्या खड्ड्यात गेली. यामध्ये चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे. कारचा वेग जास्त असल्याने कारचालकाचा कार वरील नियंत्रण सुटले होते अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.
Mumbai Live: जरांगेंच्या मागण्यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली - विखेजरांगेंच्या मागण्यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली - विखे
शिंदे समितीत मुदत देण्याची जरांगेंची मागणी मान्य केली - विखे
न्यायमूर्ती शिंदे समितीला ६ महिन्याची मुदतवाढ
Gold rate live : सोन्या-चांदीच्या भावात अडीच हजार रूपयांची वाढ5 दिवसात सोन्या चांदीच्या भावात प्रत्येकी 2 हजार 500 रुपयांची वाढ
गणेशोत्सवाच्या एक दिवस अगोदर जीएसटी विना सोन्याची भाव एक लाखांच्या पार
जळगाव सुवर्णनगरीत जीएसटी विना 24 कॅरेट सोन्याचे भाव 1 लाख 800 रुपयांवर
जीएसटीसह 24 कॅरेट सोन्याचे भाव 1 लाख 3 हजार 824 रुपयांवर
जीएसटी विना 22 कॅरेट सोन्याचे भाव 92 हजार 330 रुपयांवर तर जीएसटीसह 22 कॅरेट सोन्याचे भाव 95 हजार 99 रुपयांवर
चांदीचे भाव जीएसटी विना 1 लाख 17 हजार 500 रुपयांवर तर जीएसटी सह चांदीचे भाव 1 लाख 21 हजार 30 रुपयांवर
Manoj Jarange Live : मुंबईत जरांगेंना आंदोलन करण्यास मनाई, हायकोर्टाने परवानगी नाकारलीउद्या मनोज जरांगे-पाटील यांचे मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करण्यास मनाई केली आहे. या आंदोलनास हायकोर्टाने परवानगी नाकारली आहे
MUMBAI Live : डोंबिवलीत आनंदी कला केंद्राच्या मूर्तिकार पसार; गणेश भक्तांचा संतापडोंबिवली पश्चिमेतील फुले रोडवरील आनंदी कला केंद्राचा मूर्तिकार अचानक पसार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने भाविकांनी येथे गणेश मूर्तींची बुकिंग केली होती. मात्र, जास्तीच्या ऑर्डर्स घेतल्यामुळे आणि एकाकी लोड आल्याने मूर्तिकाराने पलायन केल्याची माहिती मिळाली आहे.
Pune Live : पुणे-सातारा महामार्गावरील कापूरहोळ हरिश्चंद्री गावाजवळ वाहतूक कोंडी-गणेशोत्सवाच्या निमित्ताने गावाकडे जाण्यासाठी गणेशभक्तांची मोठी गर्दी.
गावी निघालेल्या गणेश भक्तांची वाहनं एकाचवेळी रस्त्यावर आल्याने ही वाहतूक कोंडी पाहायला मिळतीय
पुणे मुंबई सारख्या शहरांमध्ये नोकरीनिमित्त राहणारे नागरिक, गणेशोत्सवासाठी घरी निघालेले असल्यान महामार्गावर मोठ्या प्रमाणात गाड्या एकाच वेळी रस्त्यावर आल्यात.... त्यातच हरिश्चंद्री येथे महामार्गावर उड्डाणं पुलाच कामं सुरू असल्यानं अशा प्रकारे वाहनांच्या रांगा लागल्याच चित्र पहायला मिळतयं
पुण्याहून-साताऱ्याच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या ह्या लांबचं लांब रांगा लागल्यात..
महामार्गावर ठिकठिकाणी अशाच प्रकारे वाहतूक कोंडी झालेली पहायला मिळतीय
Chandrapur Live : चंद्रपुरात भाजपाच्या ओबीसी सेलचं आंदोलन, मनोज जरांगेंविरोधात घोषणाबाजीमनोज जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने भाजपच्या ओबीसी विभागातर्फे चंद्रपुरात निदर्शने करत निषेध करण्यात आला. भाजपाचे ओबीसी सेल महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अशोक जीवतोडे यांच्या नेतृत्वात हे निषेध आंदोलन करण्यात आले.
Beed Live : बीड जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश, मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय...मराठा आंदोलन प्रणेते मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने भाजपच्या ओबीसी विभागातर्फे चंद्रपुरात निदर्शने करत निषेध करण्यात आला. भाजपाचे ओबीसी सेल महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अशोक जीवतोडे यांच्या नेतृत्वात हे निषेध आंदोलन करण्यात आले.
Nagpur Live : नागपूरात कंत्राटदारांचे 'भीक मांगो' आंदोलननागपूरच्या संविधान चौकात विदर्भातील कंत्राटदारांनी एकत्र येत 'भीक मांगो' आंदोलन केले. काळे टी-शर्ट घालून कंत्राटदारांनी शासनाच्या विरोधात निषेध नोंदवला.
शासनाने काम करूनही थकबाकी न दिल्यामुळे संतापलेल्या कंत्राटदारांनी रस्त्याच्या कडेला उभे राहून प्रतीकात्मक भीक मागत आंदोलन केले.
Pune Live : गणेशोत्सवाची लगबग! पुणे-बेंगलोर महामार्गावर टोल नाक्यांवर वाहनांची गर्दीगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यांवर वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या आहेत. साताऱ्यातील आनेवाडी टोल नाक्यावर कोकणाकडे निघालेल्या वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे वाहनचालक आणि टोल प्रशासन यांच्यात वारंवार वादाची परिस्थिती निर्माण होत आहे.
Beed Live Update: मराठा, ओबीसी आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये जमावबंदीचे आदेशबीड जिल्ह्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन सुरू असताना प्रशासनाने जमाबंदीचे आदेश दिले आहेत. बीड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि कोणतीही अप्रिय घटना घडू नये म्हणून खबरदारी घेतली जात आहे. हे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत.
Devendra Fadanvis Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी जरांगे पाटील यांच्या भेटीलाराजेंद्र साबळे आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटलांना भेटण्यासाठी पोहोचले आहेत. मुंबईतील आंदोलनावर चर्चा करून ते मागे घेण्याची विनंती करण्याची शक्यता आहे.
Ranjangaon Live Update: रांजणगाव महागणपती येथे भाद्रपद महोत्सवाला सुरुवातअष्टविनायकांपैकी एक असलेल्या रांजणगाव महागणपती मंदिरात भाद्रपद महोत्सवाची शुभारंभ झाला आहे. पहाटेपासूनच महागणपतींच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी जमली होती. धार्मिक विधी, महाअभिषेक, आरती आणि कीर्तन-भजनांच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला आहे. महोत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसर विद्युतरोषणाईने उजळला असून सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल होणार आहे. स्थानिक कलाकार, कीर्तनकार आणि प्रवचनकार यांचा सहभाग भक्तांना अध्यात्मिक ऊर्जा देणार आहे.
Rahul Gandhi Live Updates: राहुल गांधी, प्रियंका गांधी, तेजस्वी यादव आणि रेवंत रेड्डी यांनी 'मतदार हक्क यात्रे'मध्ये भाग घेतलालोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी, काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वाड्रा, बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि राजद नेते तेजस्वी यादव आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी 'मतदार हक्क यात्रे'मध्ये भाग घेतला.
Saurabh Bhardwaj Live Updates: सौरभ भारद्वाज यांच्याविरुद्ध दाखल केलेला गुन्हा खोटा आहे -आप नेते सौरभ भारद्वाज यांच्याविरुद्ध ईडीच्या छाप्यांवर आप खासदार संजय सिंह म्हणाले, "... सौरभ भारद्वाज यांच्याविरुद्ध दाखल केलेला गुन्हा खोटा आहे. ज्या वेळी ईडीने हा गुन्हा दाखल केला तेव्हा ते मंत्रीही नव्हते... आप नेत्यांविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात टाकणे हे मोदी सरकारचे धोरण बनले आहे... पंतप्रधान मोदींच्या बनावट पदवीवर देशात चर्चा होऊ नये म्हणून ईडीने छापे टाकले आहेत..."
Saurabh Bhardwaj Live Updates: पंतप्रधानांनी पदवीबद्दल खोटे बोलल्याचे देशासमोर आले आहे - आप नेते मनीष सिसोदियाआप नेते सौरभ भारद्वाज यांच्यावरील ईडीच्या छाप्याबद्दल आप नेते मनीष सिसोदिया म्हणाले, "सौरभ भारद्वाज यांच्या घरावर ईडीच्या छाप्यामागील एकमेव कारण म्हणजे काल पंतप्रधानांच्या पदवीबद्दल मोठा खुलासा झाला. पंतप्रधानांची पदवी बनावट असल्याचे देशासमोर आले आहे. पंतप्रधानांनी पदवीबद्दल खोटे बोलल्याचे देशासमोर आले आहे... पंतप्रधानांच्या पदवीच्या मुद्द्यावरून लक्ष हटवण्यासाठी ईडी सौरभ भारद्वाज यांच्या घरावर छापा टाकत आहे..."
Mumbai Live Updates: महाराष्ट्र टपाल मंडळाची गणेशोत्सवानिमित्त अनोखी भेटमहाराष्ट्र टपाल मंडळाची अनोखी भेट गणेशोत्सवानिमित्त "गणेशोत्सव: महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा" या संकल्पनेवर आधारित विशेष पोस्टकार्ड आणि कॅन्सलेशन चे प्रकाशन लालबागच्या राजाच्या मुखदर्शनावेळी करण्यात आले.
Pune Live : वरंधा घाट वाहतुकीस खुलादरड कोसळल्याने वाहतुकीस बंद असलेला वरंधा घाट आता सुरु कऱण्या आला आहे. यामुळे कोकणात जाणाऱ्यांचा प्रवास सुखकर होणार आहे.
Mumbai Live : मंत्रिमंडळाची बैठक आज; महत्त्वाच्या घोषणा होण्याची शक्यताराज्याच्या मंत्रिमंडळाची आज बैठक होत असून, मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Pune Live : खडकवासला धरणातून विसर्ग वाढविला, मुठा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशाराखडकवासला धरणातून विसर्ग वाढविला असून तो ८, ५१७ क्युसेक इतका करण्यातआला आहे, मुठा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Monsoon Live : मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यतामराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात २६-३० ऑगस्ट दरम्यान मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
Congress MLA : पलक्कडचे काँग्रेस आमदार राहुल ममकूटाथिल यांची हकालपट्टीकन्नूर (केरळ) : केरळमधील पलक्कडचे काँग्रेस आमदार राहुल ममकूटाथिल यांना लैंगिक गैरवर्तनाच्या अनेक आरोपांनंतर सोमवारी केरळ प्रदेश काँग्रेस समितीने पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वावरुन हकालपट्टी केली, अशी माहिती समित्रीचे अध्यक्ष सनी जोसेफ यांनी दिली. मात्र, त्यांनी ममकूटाथिल यांच्या आमदारपदाच्या राजीनाम्याची विरोधकांची मागणी फेटाळली.
OBC leader Laxman Hake : ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंसह 14 लोकांवर सुमोटोनुसार गुन्हा दाखलबीडच्या गेवराईमध्ये काल ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित यांच्यामध्ये गेवराईच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये राडा झाला होता आणि यामध्ये लक्ष्मण हाके यांच्या अंगावरती आमदार विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांकडून चपला फिरकवण्यात आल्या होत्या, तर हाके यांच्या समर्थकांकडून गाडीवरती उभारून दांडके दाखवण्यात आले होते आणि यानंतर पोलिसांनी सुमोटोनुसार 14 आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये ओबीसी नेते हाके यांचाही सहभाग आहे.
Swargate Bus Station : गणेशोत्सवानिमित्त गावाकडे जाण्यासाठी कोकणवासीयांची स्वारगेट बस स्थानकात मोठी गर्दीपुणे : गणेशोत्सवानिमित्ताने गावाकडे जाण्यासाठी कोकणवासीयांची स्वारगेट बस स्थानकावरती मोठी गर्दी पहायला मिळाली. उद्यापासून गणेश उत्सवाला सुरुवात होत आहे. त्यानिमित्ताने कोकणवासीय नागरिक आपापल्या गावी जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. कोकणाकडे जाणाऱ्या बसमध्ये मोठी गर्दी आहे.
Ichalkaranji News : मूर्ती अंगावर पडून इचलकरंजीत एकजण गंभीर जखमीइचलकरंजी : ट्रॉलीतून नेण्यात येत असलेली गणेशाची मूर्ती ड्रेनेज खोदाईमुळे झालेल्या खड्डेमय रस्त्यामुळे कलंडली आणि पाच जणांच्या अंगावर पडली. यामध्ये नंदकुमार रावसाहेब देसाई (वय ४९, रा. स्वामी मळा) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इतर चार कार्यकर्तेही किरकोळ जखमी झाले आहेत. याबाबतची नोंद आयजीएम रुग्णालयात झाली आहे.
Kolhapur Rain : पंचगंगेचे पाणी पात्रात, पातळी चार फुटांनी घटली; १९ बंधारे पाण्याखाली, ६३ मार्ग बंदकोल्हापूर : जिल्ह्यात रविवारीही पावसाची उघडीप राहिल्याने पंचगंगेच्या पाणीपातळीत दिवसभरात तब्बल चार फूट तीन इंचांनी घट झाली. ही पातळी २५ फूट तीन इंच इतकी उतरल्याने पंचगंगेचे पाणी नदीपात्रात गेले. दिवसभरात ढगाळ वातावरण राहिले. काही काळ सूर्यदर्शनही झाले. तसेच अधूनमधून पावसाच्या हलक्या सरीही कोसळल्या. अशा विचित्र वातावरणाचा अनुभव आज नागरिकांना अनुभवायला मिळाला. अद्याप १९ बंधारे पाण्याखाली आहेत. तसेच ६३ मार्गावर पाणी असल्याने ते बंद असून, पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे.
Pratap Sarnaik : एसटी कर्मचाऱ्यांचा पगार गणेशोत्सवापूर्वी देणार; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची माहितीमुंबई : राज्य शासनाच्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटीच्या सुमारे ८३ हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन गणेशोत्सवापूर्वी देणार असल्याची माहिती परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सोमवारी दिली.
राजस्थान, हिमाचलमध्ये पावसाचा जोर; आजही मुसळधार पावसाचा अंदाज, शाळा बंद ठेवण्याचे आदेशजयपूर : राजस्थानामध्ये जोरदार पाऊस सुरूच असून, मंगळवारी (ता. २६) राज्याच्या विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सुरक्षिततेची खबरदारी म्हणून जयपूरसह इतर जिल्ह्यातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिवाय हिमाचल प्रदेशातही पावसाचा अंदाज असून राजधानी नवी दिल्लीत पावसाने हजेरी लावली.
Cotton Import : कापूस आयातीला विरोध; संयुक्त किसान मोर्चाकडून आंदोलनाची घोषणाLatest Marathi Live Updates 26 August 2025 : केंद्र सरकारने कापूस आयातीवरील ११ टक्के शुल्क १९ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या कालावधीसाठी हटविण्याचा अंतरिम आदेश जारी केला आहे. तसेच केंद्र सरकारने दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना दिलेली झेड श्रेणीतील ‘सीआरपीएफ’ सुरक्षा मागे घेतली. राजस्थानामध्ये जोरदार पाऊस सुरूच असून, मंगळवारी (ता. २६) राज्याच्या विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सुरक्षिततेची खबरदारी म्हणून जयपूरसह इतर जिल्ह्यातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पदवी सार्वजनिक करण्यासाठी दिल्ली विद्यापीठाला बाध्य केले जाऊ शकत नाही, असा निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदी आमदार अमित साटम यांची निवड केली आहे. ओबीसी समाजाचे नेते प्रा. लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर आमदार विजयसिंह पंडित यांच्या समर्थकांनी गेवराईमध्ये सोमवारी दगडफेक केली. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..