Most Sixes : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांचा वर्ल्ड रेकॉर्ड कुणाच्या नावावर? रोहित कितव्या स्थानी?
GH News August 27, 2025 03:12 AM

लवकरच आशिया कप 2025 स्पर्धेला सुरुवात होणार आहे. त्याआधी श्रीलंका झिंबाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. पाकिस्तान, यूएई आणि अफगाणिस्तान यांच्यात टी 20i ट्राय सीरिज खेळवण्यात येणार आहे. तर टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यानंतर महिन्याभरानंतर मैदानात उतरणार आहे. क्रिकेटमध्ये दररोज असंख्य रेकॉर्ड होत असतात. तसेच रेकॉर्ड ब्रेकही होत असतात. सध्या टी 20 क्रिकेटची चलती पाहायला मिळत आहे. टी 20 क्रिकेटमध्ये बुलेट स्पीडने धावा होतात. फलंदाज प्रत्येक चेंडूवर फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करतात. अनेक फलंदाज सातत्याने धावा करत असतात. सोबतीला एकदिवसीय आणि कसोटी मालिकाही खेळवण्यात येतात. तिन्ही फॉर्मेटमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम हा अजूनही सचिन तेंडुलकर याच्या नावावर आहे. असाच एक वर्ल्ड रेकॉर्ड भारताच्याच फलंदाजाच्या नावावर आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्थात कसोटी, वनडे आणि टी 20i या तिन्ही फॉर्मेटमध्ये सर्वाधिक षटकारांचा वर्ल्ड रेकॉर्ड रोहित शर्माच्या नावावर आहे. या निमित्ताने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त षटकार मारणाऱ्या 7 फलंदाजांबाबत जाणून घेऊयात. या 7 फलंदाजांमध्ये रोहित व्यतिरिक्त आणखी एका भारतीयाचा समावेश आहे. या सात फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा, ख्रिस गेल, शाहीद आफ्रिदी, ब्रँडन मॅक्युलम, मार्टिन गुप्टील, जोस बटलर आणि महेंद्रसिंह धोनी यांचा समावेश आहे.

रोहित शर्मा याने टी 20I आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. रोहित आता फक्त एकदिवसीय क्रिकेटमध्येच खेळणार आहे. रोहितने आतापर्यंत एकूण 499 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 637 षटकार लगावले आहेत.

ख्रिस गेल याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन अनेक वर्ष झाली आहेत. मात्र त्यानंतरही गेल या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. गेलने 483 सामन्यांमध्ये 553 षटकार लगावले आहेत.

पाकिस्तानचा माजी ऑलराउंडर शाहिद अफ्रिदी तिसऱ्या स्थानी आहे. अफ्रिदीने 524 सामन्यांमध्ये 476 षटकार लगावले आहेत.

न्यूझीलंडचा फलंदाज ब्रँडन मॅक्युलम चौथ्या क्रमांकावर आहे. मॅक्युलमने 432 सामन्यांमध्ये 398 षटकार लगावले होते.

ब्रँडन मॅक्युलम याच्यानंतर पाचव्या स्थानीही न्यूझीलंडचाच आणखी एक फलंदाज आहे. मार्टिन गुप्टील पाचव्या क्रमांकावर आहे. गुप्टीलने 367 सामन्यांमध्ये 383 षटकार लगावले आहेत.

इंग्लंडचा विकेटकीपर बॅट्समन जोस बटलर सहाव्या क्रमांकावर विराजमान आहे. बटलरने 384 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आतापर्यंत एकूण 369 षटकार लगावले आहेत. बटलर अजूनही खेळतोय. त्यामुळे बटलरला या यादीत आणखी वर जाण्याची संधी आहे.

सातव्या स्थानी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी सातव्या स्थानी आहे. धोनीने 538 सामन्यांमध्ये 359 षटकार लगावले होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.