नृत्यापासून विश्रांती घेत असलेले बाप्पा… कट्टर गणेश भक्ताला विघ्नहर्त्याच्या या प्रत्येक मुद्रेचं रहस्य माहीतच हवं
Tv9 Marathi August 26, 2025 11:45 PM

Ganesh Chaturthi 2025: वर्षभरानंतर अखेर ज्या दिवसाची प्रतिक्षा होती तो दिवस आलाा आहे… बुधवारी म्हणजे म्हणजे उद्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाची स्थापना होणार आहे. गणरायाची स्थापना होण्यापूर्वी मुर्ती कारखाण्यात आकर्षक मुर्त्या असतात. पण प्रत्येक मुर्तीचं वेगळं महत्त्व आहे. प्रत्येकाच्या घरात येणाऱ्या बाप्पाचं खास महत्त्व असतं. विविध आकारातील बप्पा अनेकांच्या घरी काही दिवसांसाठी येतात. पण विघ्नहर्त्याच्या प्रत्येक मुद्रेचं रहस्य हे भक्ताला माहितीच पाहिजे…

डाव्या सोंडेचा गणपती – डाव्या सोंडेचा गणपती ज्याला आपण वक्रतुंड देखील म्हणतात. डाव्या सोंडेचा गणपती प्रत्येकाला आवडतो… हा गणपती सर्वात साधा आणि लोकप्रिय रुपातील गणपती आहे. ही दिशा उत्तर दिशेशी संबंधित आहे आणि चंद्राच्या विशेष उर्जेशी संबंधित आहे. चंद्राची ही ऊर्जा शांती, आनंद आणि भौतिक समृद्धीचं प्रतिनिधित्व करते. म्हणूनच, डाव्या बाजूला वाकलेली सोंड असलेला गणेश लक्ष्मीचा आशीर्वाद देणारा मानला जातो.

उजव्या सोंडेचा गणपती – उजव्या सोंडेच्या गणपतीला सिद्धिविनायक आणि दक्षिणाभिमुखी देखील म्हटलं जातं. या रुपाची विशेषतः म्हणजे गणपतीची सोंड उजव्या बाजूला असते. असं मानलं जातं की, घरात उजव्या सोंडेच्या गणपतीची मुर्ती किंवा चित्र लावल्यास आर्थिक परिस्थिती सुधारते… उजव्या सोंडेच्या गणपतीची पूजा केल्या येणाऱ्या अडचणी देखील नष्ट होतात.

सरळ सोंडेचा गणपती – सरळ सोंडेच्या गणपतीच्या रुपाला सर्वात खास आणि दुर्लभ मानलं जातं. हे रूप महत्त्वाचे आहे कारण त्याची सोंड सरळ वरच्या दिशेने आहे, जी सुषुम्ना नाडीच्या उघडण्याचं प्रतीक आहे, जी आपल्या शरीरातील मन आणि आत्म्याला जोडणारी मुख्य ऊर्जा वाहिनी आहे. जे मन आणि आत्म्याला जोडते. जेव्हा ही नाडी उघडते तेव्हा व्यक्ती आणि देव यांच्यात एक खोल सुसंवाद निर्माण होतो. असं मानलं जातं की या अवस्थेत व्यक्ती पूर्णपणे आध्यात्मिक उर्जेने भरलेली असते आणि जीवनात शांती, यश आणि संतुलन येते.

बसलेला बाप्पा – बसलेल्या गणरायाची घरात स्थापना आणि पूजा करणं फार शुभ मानलं जातं. अशी मान्यता आहे की, घरात बसलेल्या बाप्पाची स्थापना केल्यानंतर योग्य रीतीने पूजा केल्यास घरात शांती, सुख आणि समृद्धी टिकून राहते… बसलेल्या गणरायामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येत असते आणि प्रत्येक इच्छा पूर्ण होते.

नृत्य मुद्रा असलेले बाप्पा – जर कोणाला कलेत आवड असेल तर, ती व्यक्ती नृत्य मुद्रेतील गणरायाची स्थापना करते. जे प्रचंड लाभदायक असतं. नृत्य करणाऱ्या किंवा वाद्या वाजवणाऱ्या गणरायाची पूजा केल्यास घरात आनंदी कायम राहतो आणि कलाकारच्या प्रयत्नांना यश मिळतं… असं देखील म्हणतात.

झोपलेले गणपती – विशेषतः उद्योजक अशा गणरायाती स्थापना करतात. कारण याला सुख – समृद्धीचं कारण मानलं जातं. झोपलेल्या गणरायाची स्थापना केल्यास घराची प्रगती आणि आर्थिक परिस्थिती मजबूत होते…

उंदरावर बसलेले गणपती – उंदरावर बसलेल्या मुर्तीचं देखील मोठं महत्त्व आहे. ही मूर्ती धैर्य आणि शौर्याचे प्रतीक आहे. असं मानलं जातं की या मूर्तीची पूजा केल्याने जीवनातील जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी बळ मिळतं आणि अडचणी सोप्या होतात.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.