कबरींमधून हाडं होतायेत गायब, तर मानवी कवट्यांची मोठी तस्करी, कारण ऐकून अधिकाऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली
Tv9 Marathi August 27, 2025 02:45 AM

इंग्लंडमधून एक मोठं वृत्त समोर येत आहे. येथील दफनभूमीतील अनेक कबरी खोदण्यात आल्या आहेत. त्यातील हाडं आणि मानवी कवट्या गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. यामागे गुन्हेगारांची टोळी असल्याची माहिती समोर येत आहे. ब्रिटनमधाल या प्रकारामुळे काही जण त्यांच्या नातेवाईकांच्या कबरींचे संरक्षण करण्याची मागणी करत आहे. काय आहे हा प्रकार? कशासाठी करण्यात येत आहे ही तस्करी, कोण आहे त्यामागे?

हाड आणि कवट्यांची ऑनलाईन विक्री

द सन न्यूजने याविषयीचे वृत्त दिले आहे, त्यानुसार इंग्लंडमध्ये निच शॉप्स आणि ऑनलाईन रिटेलर्स प्लॅटफॉर्मवर मानवी कवटी आणि हाडांची राजरोजस विक्री केली जात आहे. इतकेच नाही तर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर किळसवाणा प्रकारही सुरू आहे. आकुंचित झालेल्या मानवी खोपड्या, लहान मुलांच्या कवट्या, मानवी चामड्यांच्या बॅग, वॉलेट, मास्कची विक्री पण येथे होत आहे. सुपरनॅचरल सोसायटीचा भाग असणारे अनेक विचित्र लोक अशा व्यक्तींची मागणी करत असल्याचे समोर येत आहे.

तज्ज्ञांचे सरकारला अपील

इंग्लंडचे प्रसिद्ध न्यायवैद्यक शास्त्रज्ञ डेम सू ब्लॅक यांनी हा ट्रेंड अत्यंत धोकादायक असल्याचे म्हटले आहे. हा ऑनलाईन बाजार बॉडी स्नॅचिंगला म्हणजे मृतदेह चोरी करण्यासाठी प्रोत्साहन देत असल्याचे ते म्हणाले. या गुन्ह्याचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. कब्रस्थानात जाऊन अनेक जण कबरी खोदत असल्याने त्यांनी चिंता व्यक्त केली. चोरट्यांना हे स्वस्तात कमाईचे साधन झाल्याचे ते म्हणाले.

पक्षांची घरटे विक्री बेकायदेशीर असेल तर मग मानवी अवशेषांची विक्री गुन्हा कसा ठरत नाही असा सवाल त्यांनी केला. एखाद्या मृतदेहाच्या दातांची माळ गळ्यात घालणं समाज कसा स्वीकार करू शकतो असा सवाल त्यांनी केला. मृत्यूनंतर तरी कुणाच्या शरीराची विटंबना करू नये. त्यांना तसंच शांततेत जगू द्यावं असं ते म्हणाले. तर अशा खरेदी-विक्री करणाऱ्यांवर आता थेट कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. अनेक जणांनी कबरींच्या रक्षणासाठी रात्रीची गस्त वाढवावी आणिसुरक्षा रक्षक नेमावे. सीसीटीव्ही बसवावे अशी विनंती केली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.