Accident News : बसची जोरदार धडक, प्रवासी वृद्धाचा मृत्यू; यवतमाळच्या दारव्हा बसस्थानक आवारातील घटना
Saam TV August 27, 2025 01:45 PM

संजय राठोड

यवतमाळ : बसस्थानकात प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. अशात बसस्थानकाच्या गेटजवळ स्थानकातून बाहेर निघत असलेल्या बसने जोरदार धडक दिल्याने वृद्ध प्रवाशाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना यवतमाळच्या दारव्हा बसस्थानक आवारात घडली आहे. या घटनेनंतर प्रवाशासह नागरिकांमध्ये एसटी परिवहन विभागासंदर्भात तीव्र रोष व्यक्त केल्या जात आहे. 

यवतमाळच्या दारव्हा येथे घडलेल्या घटनेत दादाराव वानखडे (रा. भांडेगाव, ता. दारव्हा) असे एसटीबसच्या धडकेत ठार झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. दारव्हा येथील बसस्थानक मागील काही दिवसांपासून विविध कारणाने चर्चेत आहे. यातच आज बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ एसटीच्या धडकेत प्रवाशांचा मृत्यू झाल्याने प्रवाशांसह नागरिकांमध्ये एसटीप्रशासना विरोधात रोष व्यक्त केला जात आहे. 

Accident News : एकाच स्पॉटवर दोन तासात चार वाहनांचा विचित्र अपघात; घटना सीसीटीव्हीत कैद

दरम्यान तेलगव्हाण वरून दारव्हा बस डेपोमध्ये एसटी येत असताना हा अपघातझाला. यामध्ये ६५ वर्षीय प्रवासी दादाराव वानखेडे यांचा मृत्यू झाला. अचानक घडलेल्या या घटनेने प्रवासी वानखडे याचा मृत्यू झाल्याने बसस्थानक परिसरात मोठी खळबळ उडाली होती. बसस्थानकातील प्रवाशांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. तर एसटीचे अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले होते. 

Pachora Crime : बँकेतून काढलेली रक्कम गाडीच्या डिक्की ठेवली; गाडी घराबाहेर लावताच चोरट्यांनी साधला डाव, चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद

पोलिसात अद्याप नोंद नाही 

बसस्थानकाच्या प्रवेशद्वारा जवळ एसटीच्या धडकेत प्रवाशांचा मृत्यू झाल्याने प्रवाशांसह नागरिकांमध्ये एसटी प्रशासना विरोधात रोष व्यक्त केल्या जात असून अद्यापही पोलिसात तक्रार देण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे बसस्थानक परिसरात दगड धोंडे मोठ्या प्रमाणात पडून असल्याने या ठिकाणी नेहमी अपघात होऊन प्रवासी जखमी होत असल्याच्या घटना घडत असतात. दरम्यान आजच्या घटनेनंतर दारव्हा पोलीस कोणावर गुन्हा दाखल करतात याकडे लक्ष लागून आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.