सागर आव्हाड
उरुळी कांचन (पुणे) : सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन (ता. हवेली) हद्दीतील कस्तुरी एम्पायरसमोर अवघ्या दोन तासात चार वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. एकाच स्पॉटवर घडलेल्या या चारही अपघाताच्या घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्या आहेत. दरम्यान या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी चारही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
पुणे- सोलापूर महामार्गावर पहाटेच्या सुमारास हे विचित्र अपघात झाले आहेत. पहाटे साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने निघालेल्या एका टेम्पोला पाठीमागून आलेल्या हायवा डंपरने जोरदार धडक दिली. या घटनेत टेम्पो व डंपर या दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातात टेम्पो चालक व डंपर चालक यांना दुखापत झाली आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक देखील खोळंबली होती.
Washim : फवारणी करताना रानडुकराचा हल्ला; जखमी मुलाचा उपचारादरम्यान मृत्यूदोघे जखमी रुग्णालयात दाखल
जखमी दोन्ही चालकांना उरुळी कांचन येथील कस्तुरी रुग्णवाहिकेचे संतोष झोंबाडे याच्या मदतीने एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. टेम्पो चालक अन्वर हा मुंबईचा असल्याची माहिती मिळाली आहे. टेम्पो चालक अन्वर याच्या पोटाला स्टेरिंगमुळे दुखापत झाली असल्याची माहिती मिळाली आहे. तर डंपर हायवा चालक हा चौफुला या ठिकाणचा असून त्याचे नाव पवन सिंग असे असल्याची माहिती मिळत आहे.
Igatpuri News : वृद्धेला खांद्यावर उचलुन नदीतून काढली वाट; उपचारासाठी रुग्णालयात नेण्यासाठी जीवघेणी कसरतत्याच ठिकाणी ट्रक- टेम्पोचा अपघात
दुसऱ्या घटनेत ट्रक व टेम्पोचा अपघात झाला आहे. ट्रकला कट मारून टेम्पो पुढे निघाला असता ट्रकचा टेम्पोला पाठीमागून धडक बसली. त्यामुळे टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो थेट रस्ता दुभाजकावरून मोकळ्या जागेत जाऊन थांबला. अपघातानंतर ट्रक व टेम्पो चालक यांच्यात बाचाबाची झाली. मात्र अपघाताचे नेमके कारण समजू शकले नाही. या दोन्ही घटनेत जीवितहानी झाली नसली तरी चार वाहनांचे नुकसान झाले आहे. सदर घटनेची माहिती उरुळी कांचन पोलिसांना देण्यात आली असून पुढील कार्यवाही पोलीस करीत आहेत.