Solapur News: 'सोलापुरात ११ विसर्जन अन् ६९ मूर्ती संकलन केंद्रे'; मिरवणूक मार्ग, विसर्जन कुंडांची आयुक्तांकडून पाहणी; यंत्रणा सज्ज
esakal August 27, 2025 09:45 PM

सोलापूर: श्री गणेशोत्सव हा शहराचा सांस्कृतिक व धार्मिक वारसा आहे. नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून तयारी पूर्ण करावी. यंदाचा गणेशोत्सव अधिक सुरक्षित, सुव्यवस्थित व पर्यावरणपूरक पद्धतीने निर्विघ्नपणे पार पडेल, याची दक्षता घ्यावी, असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी मिरवणूक मार्ग व विसर्जन कुंडाच्या पाहणीदरम्यान दिले. तसेच शहरात ११ विसर्जन कुंड अन् ६९ मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Dhairya Kulkarni: सह्याद्रीतून मिळाला ‘एलब्रुस’चा आत्मविश्वास; धैर्या कुलकर्णीने उलगडला यशाचा प्रवास; ‘सकाळ’ समूहाच्या वतीने सत्कार

श्री गणेशोत्सवाच्या निमित्ताने महापालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी शहरातील मिरवणूक मार्गाची पाहणी केली. यावेळी मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळ, लोकमान्य संयुक्त मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळ तसेच सर्व मध्यवर्ती मंडळांच्या मिरवणूक मार्गांची पाहणी करण्यात आली. याशिवाय विष्णू घाट, गणपती घाट, छत्रपती संभाजी महाराज तलाव येथील कृत्रिम विसर्जन कुंडांचीही पाहणी करण्यात आली.

यंदा शहरात ११ ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंड तसेच ६९ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात येणार असून नागरिकांना सुरक्षित, सुव्यवस्थित व पर्यावरणपूरक विसर्जनाची सुविधा उपलब्ध होणार आहे. या पाहणीदरम्यान आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता सारिका आकुलवार, अतिक्रमण व कोंडवाडा विभागाचे नियंत्रण अधिकारी तपन डंके, कार्यकारी अभियंता (विद्युत) राजेश परदेशी यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Maratha Reservation: 'साताऱ्यात मराठा आंदोलनाच्या तयारीला वेग'; समाजबांधवांची बैठक; पोवई नाक्यावर घोषणाबाजी..

आयुक्तांच्या सूचना

रस्त्यावरील खड्डे बुजविणे, मिरवणूक मार्गावर पुरेशी प्रकाशयोजना, झाडांच्या फांद्या छाटणे, केबलचे नियोजन करणे, विसर्जन कुंडांवर अधिक प्रकाशयोजना करणे व कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे, रस्त्यावर जनावरे येणार नाहीत, याची काळजी घेणे. तसेच मिरवणूक मार्गावर ड्रेनेजचे पाणी वाहणार नाही, यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.