महाराष्ट्रभर घराघरांत गणेशाची प्रतिष्ठापना, उत्साहाचं वातावरण.
कोकणात विशेष आनंद; मुंबईतील मंडळांनी सजवले भव्य मखरे.
दादर फुल मार्केटमध्ये सकाळपासून प्रचंड गर्दी, मोदक-करंजींचा सुगंध.
पोलिस आणि प्रशासनाची वाहतूक व सुरक्षा व्यवस्था कडक.
अवघा महाराष्ट्र सध्या बाप्पामय झाला आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक घरांत मंगलमय वातावरण पसरले असून प्रत्येक ठिकाणी आनंद, भक्ती आणि उत्साह यांचा संगम दिसून येतोय. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात रस्ते, गल्लीबोळ आणि सोसायट्या दुमदुमल्या आहेत. कोकणातील गावांमध्ये या सणाला विशेष महत्त्व आहे.
श्रावणातले विविध सणांपैकी गणेशोत्सव हा कोकणवासीयांसाठी सर्वांत मोठा सण आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून मुंबई, पुणे, ठाणे अशा शहरी भागातून हजारो नागरिक आपल्या मूळगावी रवाना झाले. कोकणातल्या रस्त्यांवर गाड्यांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. शनिवारीपासूनच कोकणातली घरे उजळून निघाली असून आज घराघरात श्रीगणेशाची प्रतिष्ठापना होणार आहे. आगमनासाठी चतुर्थी प्रारंभ दुपारी ०१.५४ ते बुधवार, २७ रोजी दुपारी ०३.४३ वाजेपर्यंत. तसेच श्रींच्या पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी ११:०५ ते दुपारी ०१:४० वाजेपर्यंत.
Ganeshotsav : गणेशभक्तांवर वेगळंच संकट! ऑर्डर पूर्ण करू शकला नाही, मूर्तिकार अचानक गायब, मूर्तीसाठी धावाधावमुंबईतदेखील गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. लालबाग, गिरगाव, दादर, परळ या भागांतील मंडळांनी आपापल्या बाप्पांची भव्य मखरे सजवली आहेत. प्रत्येक मंडळाने थाटामाटात स्वागत केले असून, काही मंडळांनी सामाजिक संदेश देणाऱ्या सजावटी केल्या आहेत. दादरमधील फुल मार्केटमध्ये आज पहाटेपासूनच प्रचंड गर्दी उसळली. मोगऱ्याच्या माळा, झेंडूची फुले, कमळ, अशोकाची पाने यांची मागणी शिगेला पोहोचली. मुंबईतील मंडळांच्या बाप्पांच्या पूजेला सुरुवात झाली आहे.
Ganeshotsav 2025: गणेशभक्तांसाठी लालपरी सज्ज, लातूरवरून २०० बस दाखल; मुंबई ते कोकण प्रवास होणार सुसाटराज्यातील पोलिस प्रशासनाने देखील या सणासाठी मोठ्या प्रमाणात तयारी केली आहे. गर्दीच्या ठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले असून, मुंबई, पुणे आणि ठाण्यात वाहतुकीसाठी विशेष मार्ग आखण्यात आले आहेत. गणेश विसर्जनावेळी सुरक्षितता राखण्यासाठी आपत्कालीन पथके आणि स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे.