देहू, ता.२७ : ढोल ताशा, लेझीम पथक आणि ‘गणपती बाप्पा मोरया’ च्या घोषणांनी देहू परिसरात गणरायाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. घरगुती गणरायाची दुपारी दीड वाजता प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. बाजार पेठेत पूजेचे साहित्य खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती.
गणेश चतुर्थी मुहूर्त दीड पर्यंत असल्याने गणेश मूर्ती खरेदीसाठी बाजारपेठ गजबजली होती. दीड ते दोन फूट उंच मूर्ति खरेदीसाठी बाजारपेठेत आणि कुंभारवाड्यात गणेश भक्तांची गर्दी झाली होती. सायंकाळी विविध गणेश मंडळानी गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली. देहूतील मानाचा नवशा गणपती मंडळाच्या गणेश मूर्ती ची प्राणप्रतिष्ठा विवेक काळोखे यांच्याहस्ते झाली. माळीनगर येथील सावतामाळी प्रतिष्ठान ने ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढली. अध्यक्ष अथर्व गोरे व पदाधिकारी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.