जालना : आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे मराठा समाजबांधवांसह अंतरावाली सराटी (ता. अंबड) येथून बुधवारी (ता. २७) मुंबईकडे निघणार आहेत. दुसरीकडे ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके हेदेखील वडीगोद्री (ता. अंबड) येथे दाखल झाले आहेत. त्यामुळे पोलिसांनी वडीगोद्री येथे मंगळपासून (ता. २६) मोठा बंदोबस्त तैनात केला असून, या गावाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
मनोज जरांगे मुंबईत २९ ऑगस्टला आंदोलन करणार आहेत. त्यासाठी ते समाजबांधवांसह बुधवारी अंतरवाली सराटीतून निघणार आहेत. दुसरीकडे ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये, म्हणून प्रा. लक्ष्मण हाके हेदेखील वडीगोद्रीत दाखल झाले आहेत.
त्यामुळे पोलिसांनी दक्षता घेतली असून ४० पोलिस अधिकारी, १९० पोलिस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे (होमगार्ड) २५० जवान, ‘एसआरपीएफ’च्या दोन तुकड्या या गावात तैनात करण्यात आल्या आहेत. त्यामुळे वडीगोद्रीला पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे.
Manoj Jarange : देवदेवतांच्या नावावर आम्हाला त्रास, सणासुदीत हिंदूंचीच अडवणूक का? मुंबईला निघण्याआधी जरांगेंचा मोदी-शहांना सवालमराठा आरक्षणप्रश्नी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाकडून बंदोबस्त तैनात केला आहे. यासाठी अधिकारी, कर्मचारी, गृहरक्षक दलाचे जवान आणि ‘एसआरपीएफ’च्या तुकड्या तैनात केल्या आहेत.
- आयुष नोपाणी, अपर पोलिस अधीक्षक, जालना