TVS मोटर कंपनीने अखेर खूप काळाच्या प्रतिक्षेनंतर आपली इलेक्ट्रीक स्कूटर Orbiter ला लाँच केले आहे. या स्कूटरची किंमत बंगळूरुच्या एक्स शोरुममध्ये ९९,९०० रुपये आहे. टीव्हीएस ऑर्बिटरमध्ये iQube डीझाईनचे एलिमेंट्ससह काही नवीन डिझाईन देखील आहेत. या नवीन स्कूटरमध्ये अनेक फिचर्स आहे. चला तर पाहूयात या नव्या स्कूटरमध्ये काय आहे खास वैशिष्ट्ये…
टीव्हीएसच्या नव्या ऑर्बिटर बाईकचे डिझाईन थोडे फंकी परंतू लेटेस्ट वाटते.यात अनेक कलरचे पर्याय देण्यात आल्याने तरुणांना ही बाईक आवडणार आहे. त्याचे इतर डिझाईन या इलेक्ट्रीक स्कूटरला दमदार बनवत आहे. याची सिट ८४५ मिमी रुंद आहे.या बाईकची फ्लोरबोर्ड देखील २९० मिमी रुंद आहे. हँडल बारच्या कारणाने रायडरला एक सरल रायडिंग ट्रायंगल मिळतो त्यामुळे ड्राईव्ह करताना आराम मिलतो.
आसनाच्या खाली ३४ लिटरचा स्टोरेज स्पेस आणि १६९ मिमीचा ग्राऊंड क्लिअरन्स आहे. टीव्हीएसने पुढे १४ इंच आणि पाठी १२ इंचाच्या चाकाचा वापर केलेला आहे. पुढचे चाक एलॉय व्हील आहे. तर पाठचे चाक १२ इंचाचे असून त्यात इलेक्ट्रीक मोटर लावण्यात आली आहे.
टीव्हीएस Orbiter मध्ये ३.१ kWh बॅटरी पॅकचा वापर केला आहे.आयडीसीच्या मते एकदा चार्ज केले केली ही स्कूटर १५८ किमीचे रेंज देऊ शकते. यात दोन रायडिंग मोड आहेत. इको आणि पॉवर असे दोन मोड आहेत. याच सोबत ही स्कूटर रिजनरेटीव्ह ब्रेकिंगसह उपलब्ध आहे. आतापर्यंत याच्या इलेक्ट्रीक मोटरच्या स्पेसिफिकेशन आणि चार्जिंग टाईमबद्दल माहिती देण्यात आलेली आहे.
टीव्हीएस कंपनीची ही स्कूटर असल्याने ऑर्बिटरमध्ये अनेक फिचर्स आहेत. चारही बाजूनी एलईडी लायटींग, मोबाईल डिव्हाईस चार्ज करण्यासाठी युएसबी चार्जिंग पोर्ट, छोटी जागा आणि ओटीए अपडेट्स देखील आहेत. यात तुम्हाला ब्ल्युटुथ कनेक्टीव्हीटी आणि टर्न-बाय-टर्न नेव्हीगेशनसह एक डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर देखील मिळते.
या शिवाय यात हिल होल्ड असिस्ट, क्रूझ कंट्रोल आणि पार्किंग असिस्ट देखील आहे. यामुळे पडण्याच्या स्थितीत ही बाईक इलेक्ट्रीक स्कूटरची इलेक्ट्रीक मोटर देखील बंद होते. TVS Orbiter निऑन सनबर्स्ट, स्ट्रेटोस ब्लू, लूनर ग्रे, स्टेलर सिल्व्हर, कॉस्मिक टायटॅनियम आणि मार्टीयन कॉपर कलरचा पर्याय मिळेल.