भारतीय क्रिकेटविश्वात सध्या वैभव सूर्यवंशीचं नाव चांगलंच गाजत आहे. 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने अल्पावधीतच आपल्या फलंदाजीने नावलौकिक मिळवला आहे. आयपीएल 2025 स्पर्धेत राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्याने दिग्गज गोलंदाजांना फोडून काढलं होतं. त्यानंतर इंग्लंड दौऱ्यातही त्याने जबरदस्त कामगिरी केली. आता वैभव सूर्यवंशी प्रो कबड्डी स्पर्धेत दिसणार आहे. त्याला प्रो कबड्डी लीगच्या 12व्या पर्वासाठी बोलवलं आहे. वैभव सूर्यवंशीवर मोठी जबाबदारी टाकली आहे. 29 ऑगस्ट 2025 पासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तेव्हा वैभव सूर्यवंशी दिग्गज खेळाडूंसोबत दिसणार आहे. प्रो कबड्डी लीगच्या 12 व्या पर्वात बॅडमिंटनपटू पुलेला गोपीचंद, माजी हॉकीपटू धनराज पिल्ले, कबड्डी स्टार प्रदीप नरवाल आणि टीम इंडियाच्या अंडर 19 संघाचा सलामी फलंदाज वैभव सूर्यवंशी दिसणार आहे. यापूर्वी विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी दिग्गज खेळआडूंनी स्पर्धेचं लाँचिंग केलं आहे.
प्रो कबड्डी लीगचा पहिला सामना तेलुगु टायटन्स आणि तामिळ थलाइवाज यांच्यात खेळला जाईल. या कार्यक्रमापूर्वी वैभव सूर्यवंशीने आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याने सांगितलं की, नॅशनल स्पोर्ट्स डे मला आठवण करून देतो की खेळ सर्वांना एकत्र आणतो. खेळ तुम्हाला टीमवर्क, शिस्त शिकवतो. राजस्थान रॉयल्स संघाचा भाग होण्यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजतो. मला विश्वास आहे की, माझ्यासारखी आणखी मुले खेळायला सुरुवात करतील.
प्रो कबड्डी लीग स्पर्धा देशातील चार शहरांमध्ये खेळली जाणार आहे. विशाखापट्टणम, जयपूर, चेन्नई आणि दिल्ली येथे सामने खेळवले जातील. या पर्वात स्पर्धेचा उत्साह वाढवण्यासाठी काही बदल करण्यात आले आहेत. पहिल्यांदाच सर्व सामन्यांचे निकाल स्पष्टपणे येणार आहे. कारण साखळी फेरीतही ट्रायब्रेकर ते ड्रॉ सामन्यांचे निकाल स्पष्ट केलं जातील. तर साखळी फेरीत आणि प्लेऑफमध्ये एक प्ले इन टप्पा सुरु केला आहे. यात टॉपचे संघ सरळ पात्र होतील. पण तिसऱ्या चौथ्या स्थानावरील संघ मिनी क्वॉलिफायरसोबत भिडतील. पाचव्या ते आठव्या क्रमांकाचे संघ प्ले-इन टप्प्यात जाण्यासाठी लढतील.