सोलापूर : सोलापुरात गणपती बाप्पांचे ढोल ताशांच्या गजरात उत्साहात आगमन झाले. भर पावसात देखील ''एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार'', ''गणपती बप्पा मोरया'', ''आला रे आला गणपती आला'' च्या जयघोषात घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये बाप्पांची भक्तीभावे प्रतिष्ठापना करण्यात आली.
Solapur News:'दादासाहेब चव्हाण यांची प्रकृती खालावली'; तीन दिवसांपासून उपोषण, वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून मोठा आर्थिक गैरव्यवहारअनेक सार्वजनिक गणेश मंडळांनी भव्य देखाव्यांचे नियोजन आणि आकर्षक सजावट केली आहे. शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये फुलांच्या माळा, तोरणे, आणि पूजेच्या साहित्याची खरेदी करण्यासाठी नागरिकांची दिवसभर गर्दी होती. ढगाळ वातावरण असल्याने सकाळी लवकरच भक्तांनी घरचा गणपती घेण्यासाठी लगबग केली होती. पारंपरिक वाद्यांच्या गजरात, ढोल-ताशांच्या निनादात बाप्पांची मिरवणूक काढण्यात आली.
अनेक मंडळांनी पारंपरिक पद्धतीने सुरेख लेझीमचे डाव सादर करत बाप्पांचे स्वागत केले. पुढील दहा दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी शहर गजबजून जाणार आहे. सोलापूर शहरात एक वेगळीच ऊर्जा संचारली आहे. बाप्पांच्या आगमनाने सर्वत्र सकारात्मकता आणि एकोप्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
धक्कादायक! 'अहिल्यानगर जिल्ह्यातील सोळाशे जनावरांना लम्पीची बाधा'; ४७ जनावरे दगावली, आकडेवाढीने चिंताही वाढली कसबा गणपती मिरवणुकीत कठपुतल्यांचा खेळमानाचा कसबा गणपतीची मिरवणूक हुतात्मा चौक येथून सकाळी ११ वाजता मोठ्या भक्तीमय वातावरणात निघाली. महापालिकेचे उपायुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते श्रीं ची महापूजा व आरती होऊन मिरवणुकीस प्रारंभ झाला. कठपुतल्यांच्या खेळाने जुन्या परंपरा व आठवणींना उजाळा मिळाला. ''मनी भक्तीचे भाव, मुखी श्रींचे'' नाम सनई चौघडा, पंचरंगी झेंडा, बैल व घोड्यांची जोडी, चारशे युवकांचे सुंदर लेझीम खेळ, लोकमान्य टिळकांचा फलक, हलग्या आणि पालखी असा सुंदर साज करत कसबा गणपतीची मोठ्या उत्साही वातावरणात मिरवणूक काढण्यात आली. अध्यक्ष बाळासाहेब मुस्तारे, सोमनाथ भोगडे, प्रकाश वाले, ॲड.मिलिंद थोबडे, मल्लिनाथ मसरे, उत्सव उपाध्यक्ष राहुल बुऱ्हाणपुरे उपस्थित होते.