Solapur Fraud: 'पंढरपूरच्या ठेकेदाराकडून दहा लाखांची फसवणूक'; बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
esakal August 29, 2025 02:45 AM

बार्शी: ठेकेदारीमध्ये रस्त्याचे काम सुरू असताना दहा लाख रुपये गुंतवल्यास काही दिवसांत २० लाख रुपये देतो असे आमिष दाखवून विश्वास संपादन करून फसवणूक केल्याप्रकरणी एक जणाविरोधात बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

तेजस दत्तात्रय पाटील (रा.गादेगाव, ता.पंढरपूर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. अंजली किरण काकडे (वय २८, रा. गाडेगाव रोड, म्हाडा कॉलनी, बार्शी) यांनी फिर्याद दाखल केली ही घटना २० जानेवारी २०२१ ते ३० जून २०२४ दरम्यान घडली.

रस्त्याच्या कामात पैशाची गुंतवणूक करा पैसे दुप्पट देतो असे विश्वास संपादन करून ऑनलाइनद्वारे ३ लाख ९७ हजार, २३८ रुपये, रोख ५ लाख रुपये, लॅपटॉप ५१ हजार रुपये अशी एकूण ९ लाख ४८ हजार २३८ रुपयांची फसवणूक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.